दर्जेदार लसूण वाण, १२५ दिवसात मिळेल ११० क्विंटल उत्पादन

दर्जेदार लसूण वाण, १२५ दिवसात मिळेल ११० क्विंटल उत्पादन
Updated on

अनुप ताले


अकोला ः अधिक दर्जेदार आणि भरघोस उत्पादन देणाऱ्या लसणाच्या नव्या वाणाची निर्मिती अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केली आहे. या वाणाची विशेषता म्हणजे, दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि केवळ १२५ दिवसात हेक्टरी ११० क्विंटलपर्यंत उत्पादन शेतकऱ्यांना या वाणापासून घेता येणार आहे. (Garlic varieties of Agriculture University, 110 quintals yield in 125 days)

पारंपरिक पिकांना फाटा देत आता शेतकरी पिकांतील विविधतेला व नवसंशोधित वाणांना अधिक महत्त्व देत आहेत. त्यामध्ये मसाला, भाजीपाला व फळपिकांच्या लागवडीवर शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. त्यातही कमी दिवसात, कमी पाण्यामध्ये घेता येणाऱ्या पिकांना शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे. त्या दृष्टीने, पोषक वातावरणानुसार व अधिक लाभ देणाऱ्या पीक वाणाच्या संशोधनावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे सुद्धा भर दिला जात आहे. याच दृष्टीकोणातून गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, कमी दिवसात अधिक उत्पादन देणारे लसूण वाण विद्यापीठाने विकसीत केले आहे. या पिकाच्या वाढीसाठी थंड व कंद धरल्यानंतर उष्ण वातावरण पोषक असल्याने ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात या वाणाची लागवड करण्याची शिफारस विद्यापीठाने केली आहे.

शेतकऱ्यांना कमी दिवसात कमी क्षेत्रावरही अधिक उत्पन्न घेता यावे व विदर्भातील, राज्यातील लसणाची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने हे नवीन लसूण वाण विकसीत केले आहे. गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, कमी दिवसात अधिक उत्पादन देणारे हे वाण असून, कीड, रोगाला प्रतिकारक आहे. परभणी येथे होणाऱ्या जॉईन्ट ॲग्रोस्कोमध्ये हे वाण सादर केले जाईल. त्यानंतर मान्यतेने शेतकऱ्यांना देण्यात येईल.
- डॉ. विलास भाले. कुलगुरू. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला

दर्जेदार लसूण वाण, १२५ दिवसात मिळेल ११० क्विंटल उत्पादन
आजपासून मॉन्सून सक्रिय; जोरदार पावसाचे संकेत

दोन वर्षापूर्वीच लागवड यंत्राची शिफारस
लसूण लागवडीसाठी मजूर संख्या अधिक लागते व त्यावर मोठ्या प्रमाणात खर्च येतो. त्यामुळे दोन वर्षापूर्वीच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापाठाने ट्रॅक्टरचलीत टोकन यंत्र (लागवड यंत्र) शिफारसीत केले होते. या यंत्राला भारत सरकारच्या संशोधन केंद्राकडूनही मागणी आहे. या यंत्राणे एका तासात दीड ते दोन एकराव पेरणी होते. त्यामुळे लागवडीसाठी लागणाऱ्या एकरी ४० मजुरांचा खर्च वाचतो.

दर्जेदार लसूण वाण, १२५ दिवसात मिळेल ११० क्विंटल उत्पादन
धक्कादायक, सिझर करताना पोटात राहिली बँडेजची पट्टी

२०१३-१४ पासून विद्यापीठाच्या गोंदिया, यवतमाळ व अकोला येथील प्रक्षेत्रावर या वाणाचे संशोधनात्मक प्रात्यक्षिके घेण्यात येऊन आता ‘एकेजी०७’ (अकोला गार्लिक ०७) नावाचे हे नवीन लसून वाण पूर्वप्रसारित करण्यात आले आहे. इतर प्रचलित वाणापेक्षा १५ ते २० दिवस आधी हे वाण तयार होते. या वाणापासून मिळणाऱ्या लसणाचा आकार मोठा, शुभ्र रंग, जाड पाकळ्या, पाकळ्यांची संख्या अधिक, विद्राव्य घटकाचे प्रमाण इतर वाणांच्या तुलनेत ४० ते ४२ टक्के व इतर प्रचलित वाणांच्या तुलणेत २० ते २२ टक्के जास्त उत्पादन आहे.
- डॉ. एस.एम. घावडे, प्रभारी अधिकारी, मिरची व भाजीपाला संशोधन केंद्र

दर्जेदार लसूण वाण, १२५ दिवसात मिळेल ११० क्विंटल उत्पादन
‘बीटी’च्या पाकिटातून प्रतिबंधित ‘एचटी-बीटी’ बियाण्यांची विक्री

कीड, रोगांना प्रतिकारक
विशेष म्हणजे या नवीन वाणाची सहनक्षमता जास्त असल्याने, तुडतुडे, पांढरी माशी या किडींना तसेच ‘करपा’ रोगाला हे वाण प्रतिकारक असल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉ. एस.एम. घावडे यांनी दिली.

संपादन - विवेक मेतकर

Garlic varieties of Agriculture University, 110 quintals yield in 125 days

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.