अकोला : १२४ उमेदवारांचा मतदानापूर्वीच विजय!

ग्रामपंचायत पोटनिवडणूक; एकच उमेदवार असल्याने सहज विजय
१२४ उमेदवारांचा मतदानापूर्वीच विजय!
१२४ उमेदवारांचा मतदानापूर्वीच विजय!sakal
Updated on

अकोला : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर काही ग्रामपंचायतींच्या प्रभागांमध्ये एक पेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने, काही ठिकाणी इच्छुकांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने तर काही ठिकाणी उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने मतदानापूर्वीच १२४ उमेदवार अविरोध विजयी झाले आहेत. तर निवडणुकीच्या रिंगणात कायम असलेल्या ४८ ग्रामपंचायतीमधील ६१ जागांसाठी २१ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजतापासून ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल व २२ डिसेंबर रोजी मतमोजणी करण्यात येईल.

राज्‍य निवडणूक आयोगाचे पत्र १७ नोव्‍हेंबर २०२१ अन्वये निधन, राजिनामा, अर्नहता किंवा इतर अन्‍य कारणांमुळे ग्रामपंचायतीमधील रिक्‍त झालेल्‍या पदांकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील २०० ग्रामपंचायतींमध्ये ४०३ पद रिक्त असल्याने त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम लागू करण्यात आला. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी ३० नोव्हेंबर पासून नामनिर्देशन पत्र सादर करण्यास सुरुवात केली.

१२४ उमेदवारांचा मतदानापूर्वीच विजय!
औरंगाबाद : प्रियकराचा दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने खून

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३४६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. संबंधित अर्जांची छाननी सात डिसेंबर रोजी करण्यात आली. त्यामध्ये ३३० उमेदवारांचे अर्ज वैध तर १६ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ९ डिसेंबरपर्यंत ५२ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे आता प्रत्यक्षात ६१ पदासांठीच ४८ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत काही ग्रामपंचायतींच्या प्रभागात एकच अर्ज दाखल करण्यात आल्याने व इतर कारणांमुळे १२४ उमेदवार मतदानापूर्वीच विजयी झाले आहेत.

इच्छुकांनी अर्ज दाखल न केल्याने १९१ जागा रिक्त

ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत ग्रामपंचायतींच्या १९१ प्रभागात उमेदवारांनी अर्ज दाखल केले नाहीत. त्यामुळे सदर जागा आता रिक्त राहणार आहेत. आयोगाच्या कार्यक्रमानुसार २०० ग्रामपंचायतींमध्ये ४०३ पदांसाठी पोटनिवडणूक होणार होती. त्यापैकी २७ जागेवरील पोटनिवडणूक ओबीसी आरक्षणामुळे आहे त्या स्थितीत स्थगित करण्यात आली असून आता प्रत्यक्षात ६१ पदांसाठीच मतदान होणार आहे. त्यासाठी १२६ उमेदवार रिंगणात आहेत.

१२४ उमेदवारांचा मतदानापूर्वीच विजय!
नांदेड : प्रचाराची रणधुमाळी सुरू

अशी आहे पोटनिवडणुकीची स्थिती

  • निवडणूक आयोगाने २०० ग्रामपंचायतींच्या ४०३ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यापैकी १९१ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल न करण्यात आल्याने ते रिक्तच राहणार आहेत.

  • ८२ ग्रामपंचायतमधीळ १२४ जागा बिनविरोध झाल्या आहेत.

  • ओबीसी आरक्षणामुळे २७ जागा स्थगित झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.