Akola Crime News : नात्याला काळिमा फासणारी घटना; चुलत आजोबाकडून अत्याचार, नात गरोदर

नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. चुलत आजोबानं १७ वर्षाच्या नातीलाच वासनेची शिकार बनवले तर याच पीडित मुलीला शेजारच्या महिलेने देखील ब्लॅकमेल करत एका तरुणासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायला भाग पाडलं.
grandfather physical abuse granddaughter neighbor women threat crime police akola
grandfather physical abuse granddaughter neighbor women threat crime police akolaSakal
Updated on

Akola News : नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. चुलत आजोबानं १७ वर्षाच्या नातीलाच वासनेची शिकार बनवले तर याच पीडित मुलीला शेजारच्या महिलेने देखील ब्लॅकमेल करत एका तरुणासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायला भाग पाडलं. या धक्कादायक प्रकारामुळे मुलगी गरोदर राहिली.

सद्यस्थितीत पीडित मुलीचे वय १८ असून ती ९ महिन्याची गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी खदान पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. खदान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीचे तिच्या ५० वर्षीय आजोबाने आंघोळ करतानाचे फोटो काढले.

त्यानंतर या आजोबाने कारमध्ये नेत ब्लॅकमेल करून फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर या आरोपीने पीडित मुलीसोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या आजोबाने अनेकदा तिच्यावर अत्याचार केले.

शेजारी राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेनेही तिला ब्लॅकमेल केलं. या महिलेने एका २३ वर्षीय तरुणासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडलं. या शहरातील मलकापूर आणि इतर ठिकाणी तिच्या अत्याचार झाला.

हा धक्कादायक प्रकार दीड वर्ष सुरु होता. मुलगी गरोदर राहिल्याने कुटुंबीयांना घटना समजली. या घटनेनंतर कुटुंबीय भयभयीत झाले. दीड वर्षांपासून आरोपी आजोबा आणि महिलेकडून अत्याचार करण्यासाठी दबाव होता.

या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुबीयांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी आरोपींवर बाल संरक्षण कायदा अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून चुलत आजोबा व २३ वर्षीय तरुणाचा तपास सुरु आहे. तर ब्लॅकमेल करणारी महिला पोलिसांच्या ताब्यात आहे. खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्या मार्गदर्शनात या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

‘त्या’ महिलेकडून दबाव आणि धमकी

पीडित मुलीला सातत्याने बदनामीची धमकी देण्यात येत होती. दोन महिन्यानंतर पीडित मुलीची मोठी बहीण घरी आली, त्यानंतर तिने हा प्रकार बहिणीला सांगितला. बदनामीच्या भीतीमुळे आई-वडिलांनी मुलीला बहिणीसोबत बाहेरगावी पाठवून दिले होते. मुलगी गरोदर राहिल्याने कुटुंबीयांना तक्रार न करण्यासाठी जीवे मारणे आणि बदनामीची धमकी दिली जात होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.