Akola : गुंठेवारी नियमानुकूल आता ऑफलाइन पद्धतीने

मनपा आयुक्‍त कविता द्विवेदी यांचा निर्णय; लाभार्थ्यांना दिलासा
land
landesakal
Updated on

अकोला : महानगरपालिका क्षेत्रातील गुंठेवारीचे भूखंड नियमानुकूल करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास येत असलेल्या अडचणी लक्षात घेता महानगरपालिका आयुक्त व प्रशासक कविता द्विवेदी यांनी ऑफलाईन प्रकरणे निकाली काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील १५ दिवस लाभार्थ्यांना ऑफलाईन अर्ज करता येणार आहे.

महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधिन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम, २००१ यात सुधारणा करण्यासाठी अधिनियम ता. १२ मार्च२०२१ अन्वये अकोला महानगरपालिका क्षेत्रा अंतर्गत गुंठेवारी भुखंड/इमारत नियमानुकूल करण्याबाबत ऑनलाईन पध्दतीने मंजुरी प्रदान करण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली होती.

मात्र, उक्त प्रणालीमध्ये काही तांत्रिक कारणास्तव मंजुरी प्रदान करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे नागरीकांना अकारण त्रास होत असल्याचे प्रशासनाचे निदर्शनास आले आहे. या अनुषंगाने मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्‍या आदेशान्‍वये नागरिकांना अधिक सोईचे व्‍हावे यासाठी विशिष्ट कालावधी करिता ऑफलाईन पध्दतीने गुंठेवारी नियमानुकूल करण्याबाबतचे प्रस्ताव स्वीकारण्यात येत आहे.

त्याअनुषंगाने गुंठेवारी निमयानुकूल करण्याबाबतचे ऑफलाईन प्रस्ताव हे कार्यालयीन दिवशी अकोला महानगरपालिका सहाय्यक संचालक, नगर रचना, यांचे कार्यालय, तसेच सर्व क्षेत्रिय कार्यालय येथे संपूर्ण आवश्यक कागदपत्रास प्रस्ताव स्वीकारण्यात येत आहे. गुंठेवारी निमयानुकूल करण्याबाबतचे ऑफलाईन प्रस्ताव ता. १७ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधित स्वीकारण्यात येतील. त्यानंतर प्राप्त होणारे ऑफलाईन प्रस्ताव स्वीकारण्यात येणार नाही, असे महानगरपालिका प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. याबाबत सर्व नागरीक, संबंधीत वास्तुविशारद, अभियंता, सर्वेअर, आरेखक यांनी नोंद घ्यावी, असे आवाहनहीकरण्यात आले.

या कागदपत्रांची आवश्यकता

विहित नमुन्‍यात अर्ज, खेरदी खत ता. ३१ डिसेंबर २०२० पूर्वीचे, नमुना ड/गाव नमुना सात, अभियंता यांनी प्रमाणीत केलेला मोजणी नकाशा, खाजगी रेखांकन नकाशाची छायांकित प्रत, क्षतीपूर्ती बंधपत्र, लेजर पेपरवर, प्रतिज्ञा पत्र (१०० रु. स्‍टॅम्‍प पेपर), स्‍वयंघोषित प्रमाणपत्र, चालू वर्षाचा मोकळ्या जागेच/इमारतीचा कर भरणा पावती, आधार कार्ड छायाप्रत, गुगल मॅप रंगीत फोटो, बांधकाम असल्‍यास स्‍ट्रक्‍चरल स्‍टॅबिलिटी प्रमाणपत्र (आवश्‍यकतेनुसार), वीज बिल छायाप्रत, वास्‍तूविशारद/अभियंता/आरेखक यांचेकडील गुंठेवारी अधिनियम अंतर्गत नियमावलीनुसार नकाशा तीन प्रती (अभियंता व अर्जदार यांचे स्‍वाक्षरीसह).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.