Gutkha Seized : स्कूल बसमधून दहा लाखांचा गुटखा जप्त

मध्यप्रदेशमधून वाशीम शहरात प्रवेश करणाऱ्या एका स्कूल बसमध्ये गुटख्याची वाहतुक होत असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली.
Gutkha Seized
Gutkha Seizedsakal
Updated on

वाशीम - मध्यप्रदेशमधून वाशीम शहरात प्रवेश करणाऱ्या एका स्कूल बसमध्ये गुटख्याची वाहतुक होत असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर नाका बंदी करून स्कूल बसची तपासणी केली असता त्यामध्ये दहा लाख रुपये किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी बस चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

मालेगावहून वाशीमच्या दिशेने पिवळ्या रंगाची एक स्कूल बस येत असून त्यामध्ये गुटख्याची वाहतुक होत असल्याची गोपनीय माहिती वाशीम शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर मालेगाव मार्गावरील वाटाने लॉन जवळ पोलिसांनी बॅरिकेट्स टाकून नाका बंदी केली. या नाका बंदीदरम्यान संशयित स्कूल बस त्या ठिकाणी तपासासाठी थांबविली.

स्कूल बसची तपासणी केली असता प्रत्येक सिटखाली पांढऱ्या रंगाचे प्लास्टिक पोते व खाकी रंगाचे काही बॉक्स आढळून आले़. या पोत्यात व बॉक्समध्ये प्रतिबंधीत गुटखा आढळून आला. ज्याची बाजार किंमत दहा लाख १८ हजार ८५० रुपये एवढी आहे. यासह दहा लाख रुपये किंमतीची स्कूल बस सुध्दा जप्त करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.