अकोलाः खदान पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या आझाद कॉलनीच्या बाजूला असलेल्या बळवंत कॉलनी येथे सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी नथूराम भगत आणि त्यांच्या पत्नीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. ही घटना शुक्रवारी (ता.5) सकाळी उघडकीस आल्यानंतर खदान पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. या घटनेला काही तास उलटत नाहीत तोच खदान पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीचा शोध घेतला असून, भगत दांपत्याची हत्या त्यांच्या घरात भाड्याने राहणाऱ्या भाडेकरूनी केली असल्याची उघड होताच त्या आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या.
अकोला शहरातील बळवंत कॉलनी परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी नथूराम भगत आणि त्यांच्या पत्नी हेमलता भगत या वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह जळलेल्या अवस्थेत आढळून आले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. तर खदान पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने या घटनेचा तपास करून याप्रकरणाचा छडा लावला. यातील आरोपी मोहम्मद रफीक मोहम्मद हमजा (वय 42) आणि मोहम्मदाबी परवीन वसीम (वय 38) या दोघाना अटक करून त्यांनी चोरून नेलेला पाच लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.आरोपींवर302, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंगल्यात नव्हते दुसरे कोणीच
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह आढळलेल्या सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी नथूराम भगत यांच्या बंगल्यात त्यांच्या पत्नी हेमलता भगत यांच्यासह दुसरे कोणीही कुटुंबीय राहत नव्हते. घरात ठराविक साहित्यालाच आग लागून धूर झाला आणि त्यामुळे जीव गुदमरल्यामुळे मृत्यू झाला झाला असावा या कयास व्यक्त केला होता. मात्र, घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
एक मुलगा पुण्यात तर दुसरा बॅंग्लोरमध्ये
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक वृद्ध दांपत्याला दोन मुलं आणि एक मुलगी आहे. यातील एक मुलगा पुण्यात तर दुसरा मुलगा बॅंग्लोरमध्ये नोकरी निमित्ताने राहतो. तर याच मृतकांच्या घराच्या बाजुला त्यांच्या मुलीचे घर असून, या घटनेची माहिती मुलगी आणि जावायाला देण्यात आली होती. तर याच मुलीने याबाबत संशय व्यक्त करून ही हत्याच असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांना तपास करण्यात गती मिळाली.
अपघात दाखविण्याचा होता प्रयत्न
आरोपी मोहम्मद रफीक मोहम्मद हमजा (वय 42) आणि मोहम्मदाबी परवीन वसीम (वय 38) या दोघांनी वृद्ध दांपत्य ज्या घरात राहत होते त्या रुममध्ये गॅस लिक करून त्या वृद्ध दांपत्याचा खून करून सोने-चांदी आणि नगदी पैसे चोरून नेले होते. पुराव नष्ट करण्यासाठी घरातील साहित्य जाळूनही टाकले. मात्र, हे करत असताना त्यांनी ठराविकच साहित्य जाळले त्यामुळे आणखी संशय वाढला. त्यामुळे आरोपी जाळ्यात अडकले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.