शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर वरवंटा; अतिवृष्टीने पिकांचे नुकसान

आठवडाभर झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर वरवंटा फिरवल्या गेला.
file photo
file photosakal
Updated on

अकोला : जिल्ह्यात गेले आठवडाभर जोरदार पाऊस झाला. मंगळवारी (ता.२८) रात्रीपासून पावसाने उत्संत घेतली. बुधवारी दिवसभर स्वच्छ ऊन पडले. असे असले तरी गेले आठवडाभर झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर वरवंटा फिरवल्या गेला.

सोयाबीन व कापशी पिकांची प्रचंड हानी झाली. मुसळधार पावसाने कापशीची बोडं काळी पडली तर सोयाबीन तोडणीला आल्यानंतर झाडावर शेंगांना कोंब फुटले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला. परिणामी शेतकरी उद्धवस्त झाला असून, कर्जाचा डोंगर आणखी वाढणा आहे.

file photo
विवाहित महिलेसह प्रियकराची गावकऱ्यांनी काढली विवस्त्र धिंड

यंदा जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून मॉन्सूनचे आगमन झाले. अकोला जिल्ह्यात सर्वच तालुक्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. जून आणि जुलै महिन्यात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत अपेक्षित पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी चांगल्या उत्पादनाची स्वप्न रंगविण्यास सुरुवात केली होती.

मात्र, जुलैच्या अखेरच्या आठवड्यात व त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर असे सलग दोन महिने पावसाने शेतकऱ्यांच्या हिरव्या स्वप्नावरच पाणी फिरविले आहे. सातत्याने जोरदार पाऊस सुरू झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शेतात पावसाचे पाणी साचत असल्यामुळे शेतमाल सडू लागला आहे. त्यामुळे बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांच्या उत्पादनाला अपेक्षित किंमत मिळत नसून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

file photo
पती-पत्नीची आत्महत्या; गळफास घेण्याआधी ३ मुलांना पाजलं विष

दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक नुकसान

अकोला जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसामुळे एक लाख ४२ हजार ७६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. पावसामुळे नऊ हजार ३८.०७ हेक्टर वरील शेत जमीन खरडून गेली. जिल्ह्यातील एक हजार ६६९ गावेही बाधित झाली. १० हजार २३६ घरांचे नुकसान झाले असून, त्यापैकी नऊ हजार ९६५ घरांचे अंशत: तर २७१ घरांची पूर्णत: हानी झाली होती.

पंचनाम्यांचे घोळ, पीक विम्यातही गोंधळ

जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकरी बेजार झाला असतानाच प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या पंचनाम्याचे घोळ पुढे येऊ लागले आहेत. अकोला तालुक्यातील अनेक गावांत चुकीचे सर्व्हेक्षण झाल्याने शेतकऱ्यांना मदतपासून वंचित रहावे लागू शकते. त्यातच प्रशासनाकडून दोन हेक्टवरील शेती पिकाचे नुकासन झाले असेल तर त्याचा सर्वेमध्ये समावेश न करण्याची सूचना तलाठ्यांना केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ना शासनाची मदत मिळू शकेल, ना पीक विमा. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी आणखीच अडचणीत सापडणार आहे.

जिल्ह्यातील गत २४ तासातील पाऊस

तालुका सरासरी (मि.मी.)

अकोट : १७.५

तेल्हारा : २८.६

बाळापूर : २०.५

पातूर : १७.९

अकोला : १४.२

बार्शीटाकळी : १५.४

मूर्तिजापूर : ६.६

एकूण : १६.५

जिल्ह्यातील तालुकानिहाय पावसाची टक्केवारी

तालुका एकूण पाऊस (मि.मी.) टक्केवारी

अकोट ६९३.१ १०१.९ टक्के

तेल्हारा ८०७.९ १२१.६ टक्के

बाळापूर ६७४.७ १०९.९ टक्के

पातूर ७८८.२ ९८.८ टक्के

अकोला ७९६.८ ११४ टक्के

बार्शीटाकळी ८४४.५ १२१.४ टक्के

मूर्तिजापूर ८७७.९ १२४.२ टक्के

एकूण ७८२ ११३.४ टक्के

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()