Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीसाठी सुटीच्या दिवशीही मदत कक्ष सुरू राहणार - डॉ. सुनील लहाने

Ladki Bahin Yojana Apply : राज्य शासनाने महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी शहरात पाच ठिकाणी मदत कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
 Help desk will be open even on holidays for ladki bahin yojana says Dr Sunil Lahane
Help desk will be open even on holidays for ladki bahin yojana says Dr Sunil LahaneSakal
Updated on

Akola News : राज्य शासनाने महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी शहरात पाच ठिकाणी मदत कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. लाभार्थी महिलांना कागदपत्र किंवा अर्ज करण्यात कोणतीही अडचण आल्यास मदतकक्षात संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महानगरपालिकेचे आयुक्‍त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांच्‍या आदेशाने महानगरपालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्‍य सभागृह मदतकक्ष स्थापन करण्यात आले. तसेच पुर्व झोनमध्ये रतनलाल प्‍लॉट चौक, पश्चिम झोनमध्ये डाबकी रोड पोलिस ठाण्याच्या शेजारी, उत्‍तर झोनमधील रेल्वे स्टेशन परिसरातील मनपाच्या जुन्या शाळा क्रमांक दोनमध्ये,

दक्षिण झोनमध्ये अब्‍दुल कलाम आजाद मार्केट, सिंधी कॅम्‍प अशा पाच ठिकाणी मदत कक्ष स्‍थापन करण्‍यात आले. या पाचही ठिकाणी मुख्‍यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अर्ज स्विकारल्‍या जाणार आहेत.

दरम्यान, सुटीच्या दिवशीही मदतकक्ष सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. योजनेसाठी पात्र असलेल्‍या शहरातील महिलांनी ३१ ऑगस्‍ट पूर्वी अर्ज दाखल करण्याचे आवाहन महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांनी केले.

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

लाभार्थी महिलेचा वयोगट २१ ते ६५ वर्षे हा ग्राह्य धरल्या जाणार आहे. तसेच अधिवास प्रमाणपत्र नसल्‍यास १५ वर्षा पुर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्‍याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या पैकी ग्राह्य धरण्‍यात येणार, परराज्‍यात जन्‍म झालेल्‍या महिलांनी महाराष्‍ट्रातील पुरूषाबरोबर विवाह केला असल्‍यास पतीचा जन्‍मदाखला, शाळा सोडल्‍याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्‍यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.