Jalna Violence : मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करा - चंद्रशेखर बावनकुळे

मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्याची बावनकुळे यांची माहिती
High-level inquiry into attack on Maratha protesters Chandrashekhar Bawankule jalna violence
High-level inquiry into attack on Maratha protesters Chandrashekhar Bawankule jalna violence sakal
Updated on

अकोला : ‘‘मराठा आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस असो किंवा अजित पवार अथवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत, कुणीही लाठीमाराचा आदेश देऊ शकत नाही.

त्यामुळे मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याचे कटकारस्थान कुणी रचले याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी भाजपच्या वतीने मी केली आहे,’’ असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

अकोला येथे भाजपच्या संवाद यात्रेच्या निमित्ताने बावनकुळे रविवारी आले असता ते माध्यमांशी बोलत होते. मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर जालना जिल्ह्यात लाठीमार झाला. यापूर्वी १० लाखांचे मोर्चे शांततेत निघाले. मराठा समाजाचे ६० मोठे मोर्चे निघाले असता एकही अप्रिय घटना घडली नाही.

ही घटना कशी घडली? कुणी कटकारस्थान केले? या मागे कुणाचे षड्‍यंत्र आहे का? याची चौकशी करण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांतर्फे मी प्रदेशाध्यक्ष या नात्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

प्रसंगी न्यायालयीन चौकशीचीही आमची तयारी असल्याचे बावनकुळे या वेळी म्हणाले. या प्रसंगी त्यांच्यासमवेत भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते.

१०० मीटर चालून आले असते तर...

शरद पवार मुख्यमंत्री असताना गोवारी हत्याकांड घडले. केवळ निवेदन स्वीकारण्यासाठी पवार १०० मीटर चालून गेले असते तर ही घटना टाळली गेली असती. त्यावेळी पवारांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला नाही. आता गृहमंत्र्यांना राजीनामा देण्यास सांगणारे पवार कोण, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

दंगलीची भाषा करू नये

देशात दंगली घडतील या प्रकाश आंबेडकर यांच्या विधानावर उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, ‘‘हा देश भगवान तथागत गौतम बुद्धांचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. प्रकाश आंबेडकर हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी दंगलीची भाषा करू नये.’’

युवकांनी दाखविले काळे झेंडे

राष्ट्रीय महामार्गावरून अकोला येथे संवाद यात्रेसाठी जात असलेल्या बावनकुळे यांना बाळापूरजवळील शेळद फाट्यावर सकल मराठा समाजाच्या वतीने काळे झेंडे दाखवून जालना जिल्ह्यातील घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर बाळापूर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.