तेल्हारा - ऐन सणासुदीच्या दिवसात खाद्य तेलासह किराणा साहित्यासह लसूण, भाजीपाल्याच्या दरात झालेली प्रचंड वाढीमुळे दिवाळीच्या फराळाला महागाईच्या झळा पोहचल्या असून, लसूणच्या फोडणीला महागाईचा तडका बसला आहे. यामुळे गृहिणीच्या किचनचे बजेट कोडमडले असल्याचे पाहवयास मिळत आहे.