अकोला ः जिल्ह्यात काही ठिकाणी बियाणे विक्रेते कृषी सेवा केंद्र (Agro Service Center) चालक शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे (soyabeen seeds) विक्री करताना उगवण चाचणी करू घेवू असे शिक्का मारून सही घेऊन विक्री करीत असल्याचे वृत्त ‘ई-सकाळ’ने ता. ३ जूनला प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत पालकमंत्री बच्चू कडू यांनी बियाण्यांची उगवण न झाल्यास उत्पादक कंपन्यांवर करवाई करण्याचे निर्देश येथे दिले. (If soybean seeds are not grown in Akola, action will be taken- Bachchu Kadu)
सध्या खरीप हंगामाची तयारी व लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे वाजवी दरात उपलब्ध व्हावे यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. तथापी, बोगस बियाणे वा उगवण न होणारे बियाणे शेतकऱ्यांना विक्री झाल्यास संबंधित बियाणे उत्पादक कंपन्यांवर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. काही ठिकाणी बियाणे विक्रेते कृषी सेवा केंद्र संचालक शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे विक्री करताना शिक्का मारून बियाणे विक्री करीत आहे. याबाबत ‘सकाळ’ने ता. ३ जूनला वृत्त प्रकाशित केले.
काही शेतकऱ्यांनी कृषी विभागासोबतच जिल्हा प्रशासनाकडेही तक्रारी केल्या आहेत. याबाबत पालकमंत्री कडू यांनी बी-बियाणे खते उपलब्धता याबाबत आढावा घेताना वरील निर्देश दिले. यावेळी आ. नितीन देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटीयार, मनपा आयुक्त निमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. के. व्ही. खोत, जिल्हा कृषी विकास अधिकारी तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
बांधावर खते, बियाण्यांचा घेतला आढावा
शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा घरपोच वा थेट बांधावर पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने ६३१ व्हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातून ६६५०० शेतकरी सभासदांपर्यंत व त्यामार्फत सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. जिल्ह्यात यामाध्यमातून २९० शेतकरी गटांमार्फत आतापर्यंत ९०७० शेतकऱ्यांना थेट बांधावर कृषी निविष्ठा पोहोच झाल्या असून हे काम सुरुच आहे. त्यात आतापर्यंत ३०८० क्विंटल बियाणे व १६२० मेट्रीक टन खते पोहोचविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी खोत यांनी दिली.याकाळात शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा पोहोचविण्याचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालक, कृषी सहाय्यक, कृषी सेवक यांचे सत्कार करा, त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करा,असेही निर्देश ना. कडू यांनी यावेळी दिले.
संपादन - विवेक मेतकर
If soybean seeds are not grown in Akola, action will be taken- Bachchu Kadu
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.