बार्शीटाकळीत ‘वैध’ धंद्यांना लाकडाऊन; ‘अवैध धंदे खुलेआम !

Illegal trades are rampant in the city of Barshitakali
Illegal trades are rampant in the city of Barshitakali
Updated on

बार्शीटाकळी (अकोला) : पुन्हा कोवीडचा प्रादुर्भाव वाढत असताना बार्शीटाकळी येथील सर्व व्यवसाय व बाजारपेठ सांयकाळी पाच वाजता काटेकोरपणे प्रशासन व पोलिस बंद करतात. बार्शीटाकळी शहरातील सुरू असलेले अवैध धंदे सायंकाळी पाच वाजल्यानंतरही मध्यरात्रीपर्यंत खुलेआम सुरू असतात. वैध धंद्यांना लाकडाउन तर अवैध धंद्यांना लॉकडाउन नाही का? असा प्रश्न शहरात अकोला येथील दहशतवाद विरोधी पथकाच्या कारवाईने उपस्थित झाला आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. 

शहरात ठिकठिकाणी अवैध देशी-विदेशी मद्य विक्री, वरली, मटका, जुगार, यासह मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. याबाबत गुप्त माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली. गुन्हे शोध कामी पेट्रोलींग करीत त्या ठिकाणी धाड टाकली असता काही इसम वरली जुगार वर खायवडी व लागवडी करताना दिसून आले. त्यामध्ये सतीश रायभान मालठाणे (रा. शहापूर), अमर त्र्यंबक जामनिक (रा . इंदिरा आवास), शेख कासम शेख हनिफ (रा अकोलीवेस), अनिल दामोदर राठोड ( रा. काजळेश्वर), सैय्यद सालर सैय्यद छोटू (रा. इंदिरा नगर), नाजीम शाह शालम शाह (रा. इमलीवन), मोहन रामकृष्ण बोबडे (रा. वंजारीपुरा), शशीकांत महादेव केदारे (तेलीपुरा) या सर्वांन जवळून ४३०० रुपये व तीन मोबाईल असा एकूण ७३०० रुपयाचा मुद्दे माल जप्त करण्यात आला.

अशाच प्रकारच्या दुसऱ्या कारवाईत राजू ताकवाले यांच्या गोठ्यातील आवारात काही इसम खुलेआम वरली जुगाराची खायवडी व लागवडी जोमात करीत असताना आढळून आले. त्यामध्ये अब्दुल सईद अब्दुल मजीद, अलीयार खान कबीर खान, पंकज पांडूरंग रनमुळे, प्रकाश कृष्णा राव आखाडे, साहेब खॉ न्यामत खॉ, सै . नजीर सै रऊफ, मोहम्मद शरीफ शेख अब्दुला (सर्व रा. बार्शीटाकळी) यांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून एकूण ६३८० रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला.

शहरातील सोमवार पेठ येथे एक इसम अवैध पणे देशी विदेशी दारू विक्री करीत असताना गोविंद कृष्णराव आखाडे आढळून आला. त्याच्या जवळून मॅकनोडल्स १२ नग, इम्पोरीयल ब्लू २० नग, व देशी दारू ७३ नग, असा एकूण ७८४६ रुपायाचा माल जप्त करून दारुबंदी कायद्यान्वेय गुन्हा नोंद करण्यात आला. (ता.१३) मार्च रोजी तिन्ही ठिकाणी केलेल्या कारवाहीत एकूण २१,५२६ रुपायांचा मुद्देमाल जप्त करून एकूण १८ आरोपींना ताब्यात घेत कारवाई केली. या कारवाईने स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर संशय उपस्थित केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()