कोरोना संसर्गामुळे पाणी टंचाईवर एकप्रकारे पडदाच पडला होता. गावागावात आहे त्या परिस्थिती नागरिक दैनंदिन गुजराण करत होते. परंतु, आता कोरोना संसर्ग कमी होताच पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त होण्यास सुरवात झाली आहे.
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना (Corona) संसर्गाचे प्रमाण कमी होताच पाणी टंचाईने (Water scarcity) डोकेवर काढले असून, प्रशासनाच्या वतीने ६५ गावामध्ये पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये ५३ विंधन विहिरीसह २३ कूपनलिकांना मंजूरी देण्यात आली आहे. (In Buldana district, 23 coupon lines including 53 bore wells have been sanctioned)
कोरोना संसर्गामुळे पाणी टंचाईवर एकप्रकारे पडदाच पडला होता. गावागावात आहे त्या परिस्थिती नागरिक दैनंदिन गुजराण करत होते. परंतु, आता कोरोना संसर्ग कमी होताच पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त होण्यास सुरवात झाली आहे. प्रशासनाच्या वतीने पाणीटंचाई निवारणार्थ सिंदखेड राजा तालुक्यातील २५, चिखली तालुक्यातील ७, संग्रामपूरमधील ५, जळगाव जामोदमधील ५ व खामगाव तालुक्यातील ५ गावासाठी ५३ विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. तसेच संग्रामपूर तालुक्यातील ७, जळगाव जामोद तालुक्यातील ५, शेगाव तालुक्यातील ६ कूपनलिकांची कामेही मंजूर आहेत. एकूण ६५ गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी उपाय योजना करण्यात आल्या.
विंधन विहिरी घेण्यात आलेल्या गावांमध्ये ही कामे सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांनी करावयाचा आहे. विंधन विहिरी सिंदखेड राजा तालुक्यातील सायाळा, आडगाव राजा, केशवशिवणी, किनगाव राजा, कुंबेफळ, मलकापूर पांग्रा, मोहाडी, साखरखेर्डा, शेंदुर्जन, नागझरी, देऊळगाव कोळ, धांदरवाडी, धानोरा, दुसरबीड, हिवरखेड पूर्णा, वर्दडी खु, खामगाव, पिंपळगाव सोनारा, नशिराबाद, सोनोशी, सुलजगाव, तडेगाव, उमनगाव, वडाळी, वाघजई, चिखली तालुक्यातील टाकरखेड हेलगा, शेलगाव जहागीर, मनुबाई, बोरगाव वसु, खैरव, पांढरदेव, किन्होळा, संग्रामपूर तालुक्यातील गुमठी, चिचारी, वसाडी नवीन, वसाडी जुनी, शिवणी, जळगाव जामोद तालुक्यातील निमखेडी, प्यारसिंग टपरी, चाळीस टपरी, गोमाळ, मेंढामारी, खामगाव तालुक्यातील हिवरा बु, जळका भडंग, पारखेड, ज्ञानगंगापूर या गावांसाठी विंधन विहीर मंजूर करण्यात आली आहे. तर संग्रामपूर तालुक्यातील भोन जुने, भोन नवीन, निवाणा, रूधाणा, एकलारा, आलेवाडी, जळगाव जामोद तालुक्यातील चालठाणा, सुनगांव, गोरखनाथ, ईसाई, शेगाव तालुक्यातील आडसूळ, भास्तन, डोलारखेड, घुई, कठोरा, सगोडा या गावांसाठी कूपनलिका मंजूर करण्यात आलेल्या आहेत.
ऐन जून महिन्यात पाणी टंचाई
साधारणत: जिल्ह्यात फेबु्रवारी ते जून पाहिल्यास पहिल्या आठवड्यापर्यंत गत काही वर्षात पाणी टंचाई राहिली आहे. परंतु, आता जूनचा दुसरा आठवडा सुरू असून, प्रशासनाने पाणी टंचाईसाठी उपाययोजना केल्यामुळे उन्हाळ्याच्या झळा अद्यापही कायम आहे. एकीकडे मुंबई सारख्या शहरात पाणी रस्त्यावरून वाहत आहे तर दुसरीकडे जिल्ह्यातील विविध गावात पाणी टंचाईमुळे नागरिक होरपळत आहे. (In Buldana district, 23 coupon lines including 53 bore wells have been sanctioned)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.