सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. किनगाव राजा पोलिसांच्या वाहनाची अगोदरपासूनच दुरावस्था झालेली आहे.
सिंदखेड राजा (बुलढाणा) : सिंदखेड राजा तालुक्यातील (sindkhed raja taluka) किनगाव राजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सोमनाथ पवार हे आपल्या सहकार्यासोबत पेट्रोलिंग करण्यासाठी निघाले. पोलिस स्टेशनमधून मार्गस्थ झाल्यानंतर सोनशी ते वर्दडी या मार्गावर पेट्रोलिंग करण्यासाठी जात असताना त्यांचे वाहन क्रमांक एम एच २८ सी ६४७३ हे वाहन चालू रनिंगमध्ये जाम झाले, त्यामुळे ठाणेदार सोमनाथ पवार सोबत असलेले पोलिस कॉन्स्टेबल गजानन सानप, श्रावण डोंगरे, चालक गजानन साळवे हे गंभीर झाले आहे. (In sindkhed raja taluka, an on duty police vehicle fell into a ten feet pit)
सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. किनगाव राजा पोलिसांच्या वाहनाची अगोदरपासूनच दुरावस्था झालेली आहे. हे जवळपास साडेतीन लाखापेक्षा जास्त किमी प्रवास होऊन सुद्धा पोलिस स्टेशनला नवीन वाहने देण्यात आले नाही. चालक गजानन साळवे यांनी गाडी जाम होत असल्याचे सांगितले. त्यांनी गाडीवर ताबा मिळविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, परंतु वाहन अचानक जाम झाल्यामुळे गाडीचे स्टेरिंग एका बाजूलाच ओढत असल्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या आठ ते दहा फूट खड्ड्यामध्ये वाहत जाऊन पलटी झाले.
त्यानंतर ठाणेदार सोमनाथ पवार हे गाडीचा दरवाजा पायाने उघडून बाहेर आले, परंतु सोबत असलेले कर्मचारी हे गाडीमध्ये अडकले होते. त्यांना बाहेर येणे शक्य नव्हते, त्यावेळी ठाणेदार सोमनाथ पवार यांनी प्रसंगावधान राखून स्वतःला जखमी असून सुद्धा सहकाऱ्यांना गाडीच्या बाहेर काढले त्यानंतर त्यांना किनगाव राजा येथील खासगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी दाखल केले.सदरचे वाहन हे वेळोवेळी नादुरुस्त असते त्यामुळे पेट्रोलिंग करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देवून पोलीस स्टेशनला नवीन गाडी देण्याची मागणी होत आहे.
पोलिस विभागाकडून पोलिसांच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी आधुनिक पोलिसिंगसाठी आग्रही असतात त्यासाठी पोलिस विभागाकडून नियोजन सुद्धा केले जाते परंतु वास्तविकता वेगळी आहे पोलिस स्टेशनला अनेक वर्षापासून नादुरुस्त वाहनातून पेट्रोलिंग व पोलिसिंग करावी लागते. कधीकधी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वतःच्या स्वखर्चातून वाहनाचे दुरुस्ती केलेली आहे. तसेच वरिष्ठांना वेळोवेळी नादुरुस्त वाहनाच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे, परंतु तरी सुद्धा वरिष्ठांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याचे पाहायला मिळत आहे. अपघातामध्ये जीवित हानी झाली असती तर याची जबाबदारी कोणी घेतली असती ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जुन्या वाहनांवरच पोलिसांना कारभार चालवावा लागत आहे. पोलिसांना खासगी वाहनांचा वापर करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर याचा परिणाम होत असून, वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी याकडे लक्ष देवून अत्याधुनिक वाहन देण्याची गरज निर्माण झाली आहे.
नादुरुस्त शासकीय वाहन तीन लाख किमी होऊन सुद्धा नवीन वाहन नाही
किनगाव राजा पोलिस स्टेशनचे वाहने तीन लाख किमी झालेले आहेत. वाहनाची दुरवस्था भयावह आहे, तरीसुद्धा किनगाव राजा पोलिसांना नवीन वाहन घेण्यात आलेले नाही. वेळोवेळी वरिष्ठांना संदर्भामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. तरीसुद्धा वाहन देण्यात आलेले नाही. पोलिसांना गुन्ह्यांचा तपास करणे आणि अटक आरोपींना न्यायालयात हजर करणे, तपासासाठी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील भागांत फिरणे आदी कारणांसाठी पोलिसांना वाहनांची गरज असते. त्यात जुनाट आणि नादुरुस्त वाहनामुळे पोलिसांची दमछाक अनेक वेळा झालेली आहे. सदरचे वाहन हे कधीही कुठेही बंद अवस्थेत नागरीकांना दिसून येत असते. कधी नागरीकांनाच पोलिसांच्या वाहनाला धक्का देवून सुरू करावे लागते. समाजाचे व नागरिकाची पोलिस विभागावर सुरक्षेतीची जबाबदारी आहे. परंतु तेच पोलिस सुरक्षेत आहे काय ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये उपस्थित झाला आहे त्यामुळे याकडे लक्ष देऊन वरिष्ठांनी नवीन वाहन देण्याची मागणी होत आहे.
(In sindkhed raja taluka, an on duty police vehicle fell into a ten feet pit)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.