Akola News : मालमत्ता करवाढीविरोधात शिवसेनेचा एल्गार; कर मनपा कर्मचाऱ्यांकडेच भरण्याचे आवाहन

महापालिकेत केले आंदोलन; व्यापारी लोकांना भेटून मालमत्ता कराबाबत जनजागृती करण्यात आली
increase in property tax shiv sena protest awareness of property tax pay tax to municipal employee only akola
increase in property tax shiv sena protest awareness of property tax pay tax to municipal employee only akolaSakal
Updated on

Akola News : महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्तांचा कर वाढविणे आणि मालमत्ता कराची वसुली खासगी कंपनीकडून करण्याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात मनपामध्ये आंदोलन करण्यात आले आहे.

अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजरजेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन निघालेला शिवसेनेचा मोर्चा श्री राजरजेश्वर, जय हिंद चौक, मोठा पुल, मोठा राम मंदिर, कापड बाजार, सराफ बाजार, चुडा मार्केट, जाजू मार्केट, दाना बाजार, खेतान गल्ली, लोहा बाजार,

गांधी चौक, तहसील चौक, चौपाटी, कोठरी बाजार, राम द्वार, कृष्ण द्वार, काला चबुतरा, ओपन थेटर, टिळक रोड, अलंकार मार्केट आदी मार्गाने फिरताना या ठिकाणी व्यापाऱ्यांची भेट घेण्यात आली.

increase in property tax shiv sena protest awareness of property tax pay tax to municipal employee only akola
Akola News : २१ आरोग्य उपकेंद्र मंजुरीचा प्रस्ताव धूळखात; हिवाळी अधिवेशनात तरी प्रश्न मार्गी लागेल काय?

व्यापारी लोकांना भेटून मालमत्ता कराबाबत जनजागृती करण्यात आली. त्यानंतर मोर्चा महानगरपालिका परिसरात पोहोचला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी घोषणा देत मालमत्ता कर कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे नव्हे तर मनपा कर्मचाऱ्यांकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले.

या मोर्चात शिवसेना पश्चिम शहर प्रमुख राजेश मिश्रा, अकोला पूर्व शहर प्रमुख राहुल कराळे, विकास पागृत, मुकेश मुरुमकार, अतुल पवनीकर, गजानन बोराळे, तरुण बागेरे, अभय खुमकर, जोस्नाताई चोरे, सुनीताताई श्रीवास,

मंजुषाताई शेळके, शुभांगी किंनगे, वर्षा पिसोडे, विशाल घरडे, नितीन मिश्रा, नितीन तठोड, ज्ञानेश्वर गावंडे, नितीन ताकवाले, अनील परचुरे, आशुतोष शेगोकार, बाळू ढोले पाटील, शरद तूरकर, किरण ठाकरे आदींसह पदाधीकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.