बहिणीच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्याला अटक करा अशी भावाची मागणी; तपासाबाबत हिवरखेड पोलिस उदासीन

Innocent civilians were crushed by an unidentified vehicle on Monday morning at Hivarkhed.jpg
Innocent civilians were crushed by an unidentified vehicle on Monday morning at Hivarkhed.jpg
Updated on

हिवरखेड (अकोला) : मॉर्निंग वाॅकला जाणाऱ्या निष्पाप नागरिकांना चिरडून पसार झालेले वाहन आणि गंभीर जखमींना तसेच सोडून पसार होणारा तो संवेदनाहीन आरोपी अजूनही पोलिसांना गवसला नसल्याने त्या अपघाताच्या तपासाबाबत हिवरखेड पोलिस उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे.

सोमवारी (ता. 5) एप्रिलला मॉर्निंग वाकला जाणाऱ्या निष्पाप नागरिकांना एका अज्ञात वाहनाने चिरडले होते. ज्यामध्ये कु. उषा जयराम गिऱ्हे या युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर वर्षा वसानी, सचिन वसानी, वर्षा भुडके इत्यादी गंभीर जखमी झाले होते. ही घटना सकाळी साडे पाचच्या दरम्यानची असून निष्पाप नागरिकांना चिरडल्यानंतर गंभीर जखमींना मदत करण्याऐवजी सदर संवेदनाहीन वाहन चालक वाहनासह तेथून सुसाट वेगाने निघून गेला. आपण पकडले जाऊ नये, यासाठी सदर व्यक्तीने अत्यंत वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन सोनाळाच्या दिशेने पळविले सोनाळा येथे पहाटे रस्त्यानजीक फिरणाऱ्या 6 युवकांपैकी सामाजिक कार्यकर्ते ललित सावळे आणि प्रशांत येटे या दोन युवकांनासुद्धा या वाहनाने चिरडण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते.

वेळीच सतर्कता पाळत या युवकांनी मोठी उडी मारून आपला जीव कसातरी वाचविला. या गडबडीत ते गाडीचा सिरीज सह पूर्ण क्रमांक पाहू शकला नाही. परंतु गाडीच्या चारपैकी सुरुवातीचे दोन क्रमांक 69 असल्याचा आणि ती गाडी इनोव्हा कार असल्याची विश्वसनीय खात्री असल्याचा दावा सुद्धा या युवकाने खासगीत बोलताना केला आहे. या घटनेतील गंभीर जखमी व्यक्तींच्या सांगण्यानुसार आणि काही अत्यंत जागरूक नागरिकांनी टूनकी येथील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेल्या चित्रानुसार हा सर्व घटनाक्रम आणि मिळालेली माहिती जवळपास तंतोतंत जुळत असल्याचे बोलले जाते.

हिवरखेड येथील अपघात 5 एप्रिल सोमवार रोजी सकाळी साडे पाचच्या दरम्यान झाला. सोनाळा येथे 5 वाजून 47 मिनिटांच्या दरम्यान त्याने दोन युवकांना उडविण्याचा प्रयत्न केला असून ठीक 5 वाजून 51 मिनिटांनी एक इनोव्हा सदृश्य गाडी भरधाव वेगाने जाताना टूनकी येथील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसत आहे. ही चित्रे आणि सर्व माहिती जागरूक नागरिकांनी हिवरखेड पोलिसांना प्रदान केली.

सीसीटीव्ही कॅमेरात गाडीचा क्रमांक दिसत नसला तरी सोनाळा येथील प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार हिवरखेड पोलिसांनी तपासाची चक्रे वेळीच योग्य दिशेने फिरविली तर लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावू शकतात. आणि आरोपीला त्या वाहनासकट जेरबंद केल्या जाऊ शकते असे मृतक महिलेचे भाऊ गणेश गिऱ्हे यांनी म्हटले आहे. मॉर्निंग वॉकसाठी निघालेली माझी बहीण परत आलीच नाही हा माझ्या निष्पाप बहिणीचा अपघात नसून हत्याच म्हणावी लागेल, त्यामुळे आरोपीला सजा मिळाल्यावरच माझ्या मृतक बहिणीला न्याय मिळेल. माझ्या बहिणीच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍याला अटक कधी होणार असा सवालही  मृतकाच्या भावाने उपस्थित केला.

हिवरखेड येथे अनेक जणांना चिरडल्यावर सोनाळा येथे आम्हाला सुद्धा उडविण्याचा प्रयत्न त्या इनोव्हा चालकाने केला. त्यामुळे पोलिसांनी वेळीच त्याला जेरबंद करावे.
- ललित सावळे, ग्रामपंचायत सदस्य, सोनाळा, जिल्हा बुलढाणा.

सीसीटीवी फुटेज चेक केले. ती गाडी सौंदळा रोडने गेली आहे. आम्ही दानापुरला विचारणा केली. परंतु माहिती मिळाली नाही. पुढील तपासासाठी विशेष पथक  नेमण्यात येईल.
- धिरज चव्हाण, ठाणेदार- हिवरखेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.