Sindkhed Raja : मातृतिर्थतील माळ सावरगाव येथील कृषी समृध्दी नव नगरच्या परिसराची हैद्राबाद टीम कडुन पहाणी

समृद्धीच्या पहिला टप्पा सुरू झाला तसे नवं नगराच्या निर्मिती संदर्भात चर्चा सुरू
inspection from Hyderabad team Krishi Samruddhi Nav Nagar smart city in Mal Savargaon sindhkhed raja
inspection from Hyderabad team Krishi Samruddhi Nav Nagar smart city in Mal Savargaon sindhkhed rajasakal
Updated on

सिंदखेड राजा - मातृतिर्थ सिंदखेड राजा तालुक्यातील माळ सावरगाव येथे प्रस्तावित असलेल्या कृषी समृध्दी नवं नगर (स्मार्ट सिटी) परिसराची तारीख ४ सप्टेंबर रोजी दुपारी ५ वाजेच्या दरम्यान हैद्राबाद येथील एका संस्थेच्या अधिकाऱ्यांनी व त्यांचे सोबत असलेल्या महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे संचालक, अधिकाऱ्यांनी नागपूर जवळील विरुल व बुलडाणा जिल्ह्यातील माळ सावरगाव येथील पाहणी केली.

नागपूर, मुंबई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस हायवे निर्माण होण्याआधी या महामार्गाच्या बाजूला जवळपास १४ ठिकाणी कृषी समृध्दी नवनगरे वसविण्याची संकल्पना राज्य सरकारने मांडली होती. समृद्धीच्या पहिला टप्पा सुरू झाला तसे नवं नगराच्या निर्मिती संदर्भात चर्चा सुरू झाली.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधला,अनेक ठिकाणी अनेक अडचणी असल्याने हा प्रकल्प पूर्णत्वास कसा जाणार असा प्रश्न होता. मात्र,सिंदखेड राजा तालुक्यातील माळ सावरगाव येथे स्मार्ट सिटीचे काम प्राधान्याने व्हावे यासाठी लोकप्रतिनिधी आणि जमीन देणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांनी भूमिका घेतली होती.

या संदर्भात मागील दोन महिन्यापूर्वी एमएसआरडीसी मुंबई येथील कार्यालयात संस्थेचे डायरेक्टर,खासदार प्रतापराव जाधव,माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर व तीन्ही गावातील सरपंच निवडक शेतकऱ्यांची बैठक झाली होती.

त्यानंतर या विषयाला गती मिळाली आहे.समृध्दी महामार्गाला लागूनच असलेल्या नागपूर व बुलडाणा जिल्ह्यातील अनुक्रमे विरुळ व माळ सावरगाव येथील स्मार्ट सिटी चा मार्ग मोकळा झाला आहे.

ए एस सी आय (ऍडमिनिस्टेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया,हैद्राबाद) चे डायरेक्टर व्ही निवास चारी व असिस्टंट प्रोफेसर मयुरी इसलावत यांच्यासह महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे संचालक अनिलकुमार गायकवाड,

महाव्यवस्थापक भूमी कैलास जाधव,दत्तप्रसाद नाडे,श्रीमंत पाटोळे,. अतिरिक्त जिल्हाधिकारी नागपूर निशिकांत सुके,कार्यकारी अभियंता भूषण मनखले,नवं नगर प्रशासक दिनेश गीते, उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके,कार्यकारी अभियंता रामदास खलसे यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.