Akola Youth Festival 2024 : अकोल्यात खंडेलवाल महाविद्यालयात भरणार कलेचा कुंभमेळा, 5 जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग

Akola Youth Festival 2024 : अकोल्यातील शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव २७ ते ३० सप्टेंबर रोजी होणार आहे.
Akola Youth Festival 2024
Akola Youth Festival 2024 sakal
Updated on

अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवाचे यंदा अकोला येथील शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्धघाटन होणार आहे. २७ ते ३० सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या युवा महोत्सवाच्या निमित्याने अकोला शहरात संपूर्ण पश्चिम विदर्भातील तरुणाई अवतरणार आहे.

महोत्सवाच्या आयोजनाबद्दत माहिती देण्यासाठी शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात पत्रकार परिषदेचे मंगळवारी (ता.२४) आयोजन करण्यात आले होते. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा युवा महोत्सवाची थीम ‘छात्र तरंग’ ही ठेवण्यात आली आहे.

महोत्सवाची माहिती पुस्तिका, नियमावली, सहभागी कलावंतांचे ओळखपत्र, स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक आणि विविध कलाप्रकारांसाठी असलेले नियम व विनियमावली, युवा महोत्सव बाबतचे नियम आदी माहिती सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना देण्यात आली आहे.

महोत्सवाचे उद्घाटन २७ सप्टेंबर रोजी खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते असतील. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अजित कुंभार, प्र. कुलगुरू डॉ.महेंद्र ढोरे, शिक्षण प्रसारक मंडळ अकोलाच्या अध्यक्ष डॉ. ताराताई हातवळणे, अरुण कुलकर्णी, गोपाल खंडेलवाल, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जगदीश साबू उपस्थित राहणार आहेत.

पत्रकार परिषदेला विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असणारे, प्राचार्य जगदीश साबू, डॉ. राजीव बोरकर, डॉ ज्ञानसागर भोकरे, प्रा. सुमेध कावळे, डॉ. निशा वराडे, अरुण शेळके यांची उपस्थिती होती.

महोत्सवात २७ कलाप्रकार

खुले रंगमंच, भिकमचंद विद्यालय, पदमानंद सभागृह, मदनलाल खंडेलवाल सभागृह, मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालय, खंडेलवाल इंग्लिश प्रायमरी स्कुल, अँड दादा देशपांडे सभागृह, वसंत सभागृह, भाऊसाहेब गोडबोले सभागृह या ठिकाणी लोक व आदिवासी नृत्य, लोकसंगीत वाद्यवृंद, पाश्चिमात्य गायन, समूहगान, एकांकिका, प्रहसन/ मूकनाट्य, शास्त्रीय गायन, भारतीय समूहगान, नकला, प्रश्नमंजुषा, चिकटकला, स्थळ छायाचित्रण इत्यादी २७ कलाप्रकार सादर होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.