अकोला :पचायला हलकी आणि आरोग्यासाठी पोषक असे महत्त्व असूनही जिल्ह्यात ज्वारी उपेक्षीत आहे. कधी नव्हे ते सोयाबीन, तूर, कापसाला सध्या सुगिचे दिवस आले असून, हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहे. परंतु, ज्वारीला हमीभावापेक्षा निम्माही भाव मिळत नसून, हमीभाव २७३८ रुपये असताना केवळ १००० ते १३०० रुपये भाव मिळत आहे.महाराष्ट्रात काही दशकांपूर्वी प्रत्येकाच्या आहारात रोज ज्वारीच्या भाकरीचा किंवा ज्वारीपासून निर्मित पदार्थांचा समावेश राहायचा. त्यामुळे आहारात ज्वारीला विशेष महत्त्व होते. कालांतराने ज्वारीची जागा गव्हाने घेतली आणि नित्य आहारात गव्हाचा उपयोग सर्वाधिक होऊ लागला. त्यामुळे महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भात (Akola Market Committee) आणि त्यातही अकोला जिल्ह्यात(Akola Market Committee) ज्वारीचा पेरा कमी होत गेला. आता तर जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन केवळ चारा पीक म्हणून घेतले जाते.
एरव्ही उत्पादन कमी व मागणी अधिक असली की, बाजारात भाव वाढतात, ज्वारीच्या भावात मात्र सातत्याने घसरण होत आली आहे. केंद्र सरकारने यावर्षी प्रतिक्विंटल २७३८ रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावाच्या निम्माही भाव ज्वारी उत्पादकाला मिळत नसल्याचे चित्र आहे. मंगळवारी ता.१८अकोल्यात बाजार समितीमध्ये(Akola Market Committee) ज्वारीला प्रतिक्विंटल १३०० रुपयांपर्यंत दर मिळाला.
तरीही ज्वारी दुय्यम
आजारी असतानाच नव्हे तर, दैनंदिन आहारात सुद्धा सकस, पोषक, हलका व पचनीय घटक म्हणून ज्वारीच्या भाकरीचा किंवा ज्वारीपासून निर्मित पदार्थांचा उपयोग करण्याचा सल्ला डॉक्टर तसेच आहार तज्ज्ञ देतात. ज्वारीच्या पिठापासून भाकर, थालीपीठ, धपाटे, उपमा, खानदेशात कळण्याच्या (ज्वारी व उडीद एकत्र दळून केलेले पीठ) पिठाची भाकरी, ज्वारीचे पापड, बिबडे, पाने, लाह्या, लाह्यांच्या जाडसर पिठाचे गोड पदार्थ, ज्वारी पीठ आंबवून केलेले धिरडे, असे अनेक पारंपरिक पदार्थ आवर्जून आवडीने तयार केले जातात. असे असले तरी, जिल्ह्यासह विदर्भात भावाच्या बाबतीत ज्वारीला दुय्यम महत्त्व मिळत असल्याचे चित्र आहे.
बाजार समितीमधील १८ जानेवारीचे दर
शेतमाल हमीभाव बाजारभाव
(प्र.क्विंटल) (प्र.क्विंटल)
ज्वारी २७३८ ११०० ते १३००
सोयाबीन ३९५० ५२०० ते ६३००
तूर ६३०० ४६५० ते ६५००
कापूस ५७२६ ९६०० ते १००२५
मका १८७० १९५० ते २०००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.