Kids Lunch Box : लहान मुलांच्या डब्यात जंक फूड नको, पौष्टिक आहारच चांगला!

Healthy eating habits for kids : रोजच्या आहारावर मुलांची वाढ, विकास, प्रतिकारशक्ती, शारीरिक आणि बौद्धिक क्षमता अवलंबून असते.
Healthy eating habits for kids
Kids Lunch BoxSakal
Updated on

अकोला : जिल्ह्यात १ जुलैपासून सर्वच शाळा सुरू झाल्या आहेत. लहान मुलांच्या डब्यात कोणते खाद्यपदार्थ द्यायचे याचे टेन्शन आईला असते. रोज पोळीभाजी द्यावी का, इतर कोणते पदार्थ द्यावे, अशे प्रश्न पडतात. बऱ्याचदा आरोग्याला हानिकारक पदार्थ दिल्याने लहान मुलांचे पोट खराब होते. त्यामुळे जंक फूड न देता पौष्टिक आहारच डब्यावर द्यायला हवा, असा सल्ला आहार तज्ज्ञ देतात.

रोजच्या आहारावर मुलांची वाढ, विकास, प्रतिकारशक्ती, शारीरिक आणि बौद्धिक क्षमता अवलंबून असते. वाढत्या वयातील मुलांसाठी पौष्टिक आणि संपूर्ण आहार अत्यंत आवश्यक असतो. लहान मुलांची शाळा सकाळची असते.

त्यामुळे शाळेचा डबा हा त्यांचा दिवसभरातील पहिला आहार ठरतो. रात्रभर झालेला उपवास आणि सकाळी शाळेमुळे मुलांना कडकडून भूक लागलेली असते. त्यामुळे पहिला आहार सात्त्विक आणि पौष्टिकयुक्त असेल, तर मुले दिवसभर उत्साही राहतात आणि त्यांची प्रतिकारशक्तीही बळकट होते, असे आहार तज्ज्ञ सांगतात.

Healthy eating habits for kids
Akola Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात कर्मचारी जखमी; नळगंगा धरणानजीकच्या रोपवाटिकेतील घटना

डब्यात काय देतो आणि तोच डबा का याबाबत मुलांशी चर्चा करावी. पौष्टिक आहाराचे महत्त्व समजून सांगावे. चुकीच्या आहाराचे कसे चुकीचे परिणाम होतील, याची कल्पना मुलांना द्यावी. मुलांसाठी स्टेनलेस स्टीलचाच डब्या वापरावा. कितीही चांगल्या क्वालिटीचे असले, तरी प्लॅस्टिकचा डबा वापरू नये, प्लॅस्टिक बॉटलमध्ये पाणी पिणे आरोग्यासाठी अयोग्य आहे.

संतुलित आहार उत्तम

डब्यात पदार्थ कोरडे असावेत. कारण पाणी जास्त असलेले पदार्थ लवकर खराब होतात. ऋतूमानानुसार डब्यातील अन्नपदार्थ ठेवावे पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते, म्हणून सहज पचतील, खायला सोपे असतील, असे पदार्थ द्यावेत, संतुलित आहारानुसार योग्य प्रमाणात प्रथिने, कर्बोदके, तंतूयुक्त (फायबर) पदार्थ योग्य प्रमाणात असायला हवेत.

मुलांना चहा, कॉफीऐवजी दूध, दुग्धजन्य पदार्थ द्यावेत. तूप लावलेली चपाती, पौष्टिक भाज्या, केळी व इतर पदार्थ द्यावेत. प्लॅास्टिकऐवजी स्टेनलेस स्टीलचा डबा व पाणी बॉटल द्यावी.

- एकता शेळके, आहार तज्ज्ञ, अकोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.