अकोला : कॅांग्रेस ने ह्या देशामध्ये सर्व धर्मीयांना सन्मानाने व सुरक्षीत पणे राहता येईल अशे वातावरण निर्माण केले आहे. कॅांग्रेस च्या सत्तेमध्ये सर्वधर्मियांना आपले धार्मिक स्वातंत्र्य अबधीत ठेवता आले. पर्यायाने भाजपा च्या काळात धर्माचा वापर राजकारणासाठी व्हायला लागला अनेक धर्मांवरती विविध अंकुश लावण्यात आले.
ह्या देशामध्ये धार्मिक अस्वस्थता निर्माण करण्याचे काम भारतीय जनता पार्टी ने केले त्या मुळे ह्या जिल्ह्यातील जनता भाजप च्या कपटी राजकारणाला कंटाळुन कॅांग्रेस च्या उमेदवाराच्या पाठी शी उभे राहुन कॅांग्रेस ला विजयी करेल अशी प्रतीक्रीया प्रदेश कॅांग्रेस चे प्रवक्ते कपिल ढोके ह्यांनी व्यक्त केली.
सातत्याने मुस्लिमांहद्दल द्वेष पसरवायचा व हिंदुंचे धार्मिक शोषण करायचे हे निच राजकारण भाजपा करत आली. परंतु ह्या जिल्ह्यातील मतदार ह्याला बळी पडणार नाहीत ते कॅांग्रेस लाच निवडुन देतील.
भाजपाचे किशोर पाटील, जयंत मसने व शाम बडे ह्यांनी केलेले आरोप हे धादांत खोटे व बिनबुडाचे आहेत मनमोहनसिंग ह्यांना कुठेही असे वक्तव्य केलेले नाही. असल्यास त्याचे पुरावे ह्या तिघांनीही सादर करावेत अन्यथा दिशाभुल केल्या प्रकरणी जनतेची माफी मागावी.
भाजपा कायम एस सी, एसटी, अल्पसंख्यांक गरीब आदीवासी ह्यांचा द्वेष करते, ह्या देशात एस सी, एस टी, मागास प्रवर्गातील, नागरीक अधिकारी झालेत महत्वाच्या पदावर बसलेत हे भाजप चे दुखणे आहे म्हणुन ह्यांचे मंत्री व भाजपचे लोकं संविधान बदलायची भाषा करतात परंतु ह्या निवडणुकीत जनता खंबीरपणे कॅांग्रेसच्या पाठीशी आहे.
कुठल्याही परिस्थीतीत भाजपाच्या दंगलखोर राजकारणाला बळी न पडण्याचा निर्धार ह्या वेळी अकोलेकरांनी केला आहे. त्या मुळे भाजपाच्या पायाखालची वाळु सरकली आहे. म्हणुन विविध प्रकारच्या अफवा पसरवुन कॅांग्रेस ला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोबतंच हिंदु मुस्लिम द्वेष पसरवण्याचे काम करंत आहेत जनतेने सुद्धा अशा अफवांना बळी न पडता कॅांग्रेस व महाविकास आघाडी चे उमेदवार डॅा. अभय पाटील ह्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे आवाहन सुद्धा कपिल ढोके ह्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.