Karanja Water Issue : नळ पाणी पुरवठ्याचा प्रश्न ‘जैसे थे’; कागदी अहवालात अडकली पिंपळगावची तहान

पिंपळगाव खुर्द येथील नळ योजना सुरू करण्याची मागणी जोर धरत असताना माशी कुठे शिंकली? हे कळायला मार्ग नाही.
water shortage in karanja
water shortage in karanjasakal
Updated on

कारंजा - पिंपळगाव खुर्द येथील नळ योजना सुरू करण्याची मागणी जोर धरत असताना माशी कुठे शिंकली? हे कळायला मार्ग नाही. पाणीपुरवठा विभाग केवळ पाहणी अहवालाचे सोपस्कार पार पाडत असल्याने गाव तहानेने व्याकुळ झाले आहे.

नळ पाणी पुरवठा योजना सुरू करावी या मागणीच्या अनुषंगाने गावातील सामाजिक कार्यकर्ते सागर दुर्गे यांनी कारंजा येथील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला निवेदन दिले होते. यातून त्यांनी योजना कार्यान्वित करून गावातील लोकांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली. या निवेदनाची दखल म्हणून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी पिंपळगावात आले आणि त्यांनी योजना सुरू करण्यासाठी येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.

गावात फिरून त्यांनी पाहणी केली असता, योजना प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी वीज पुरवठा ही प्रमुख अडचण लक्षात आल्याने त्यांनी ग्रामपंचायतीला पत्र देऊन वीज पुरवठा उपलब्ध होईल, अशी कार्यवाही करावी असे सूचित केले. लोकांनी मागणी करून वीस दिवस उलटून गेले पण ग्रामपंचायतीने वीज पुरवठ्याबाबत अद्याप ठोस असे काही केलेले नाही. योजना सुरू करण्याच्या अनुषंगाने संबंधित विभाग कागदी घोडे नाचवण्यापलीकडे काहीही करत नाही.

सागर दुर्गे व पिंपळगावातील इतर ग्रामस्थांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांना योजना सुरू करण्यासंदर्भात आवश्यक पावले उचलावीत अशी मागणी केली. परंतु या विभागाने पूर्वीच्या निवेदनाचा संदर्भ देऊन सागर दुर्गे यांना पत्र दिले आहे. या पत्रात या विभागाने जल जीवन मिशनअंतर्गत पिंपळगाव खु.येथील नळ पाणी पुरवठा योजनेतील विहीर, पंप गृह, उर्ध्व वाहिनी इत्यादी कामे पूर्ण आहेत व उंच पाण्याच्या टाकीचे काम हे प्रगतीपथावर असल्याचे म्हटले आहे.

ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने या पत्रात आणखी असे नमूद केले की, गावातील जुन्या वितरण व्यवस्थेची गेल्या १ मार्च रोजी पाहणी केली असता या व्यवस्थेचे ट्रायल अँड रन घेण्याचे निर्देश उपविभागीय अभियंता यांनी दिले होते. त्यानुसार २८ मे रोजी संयुक्त पाहणी केल्यावर असे दिसून आले की, उधर्व वाहिनीवर लिकेज असल्यामुळे उंच पाण्याच्या टाकीमध्ये पाणी घेता येत नाही. हे लिकेज दुरुस्तीसाठी संबंधित कंत्राटदारास निर्देशित करण्यात आले आहे. तसेच वीज जोडणी उपलब्ध करून देण्याबाबत सुध्दा ग्रामपंचायतीला सूचना देण्यात आल्या आहे.

टाकीत पाणी घेतल्यानंतर वितरण व्यवस्थेची ट्रायल अँड रन घेण्यात येईल. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग हे असे पत्र देऊन मोकळा झाला आहे. नुसतेच कागदी घोडे नाचवले जात आहे. योजना सुरू करून गावातील नळ पाणी पुरवठ्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी कोणीच ठोस असे काही करत नाही. म्हणून हा प्रश्न आजही जैसे थे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.