Cotton Crop : तालुक्यात पांढऱ्या सोन्याला मजूर मिळेना! कापूस वेचणीचे दर वाढले; किलो मागे दहा ते बारा रुपये मजुरी
Cotton Crop : कापूस वेचणीच्या काळात तालुक्यात पांढऱ्या सोन्याला मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कापूस वेचणीचे दर वाढल्यामुळे मजुरी किलोला दहा ते बारा रुपये वाढली आहे.
बाळापूर : तालुक्यात सध्या कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसून मनुष्यबळाच्या टंचाईने मजुरी दुपटीने वाढली आहे. याचाच फायदा ठेकेदारांनी घेतला असून, परप्रांतातील मजूर तालुक्यात शेतमजुरी करतांना दिसत आहेत.