शाळेच्या दुरुस्तीसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

शिरपूर येथील जि प उर्दू मुलांची केंद्रीय शाळा विविध बाबतीत नादुरुस्त
letter to Chief Executive Officer for school repairs
letter to Chief Executive Officer for school repairs
Updated on

शिरपूर जैन - शिरपूर येथील जि प उर्दू मुलांची केंद्रीय शाळा विविध बाबतीत नादुरुस्त असून ती दुरुस्त करण्यात यावी, यासाठी ता १८ रोजी शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जि प वाशिम यांना निवेदन दिले आहे.

शिरपूर येथील गुजरी चौकातील जि प उर्दू मुलांची केंद्रीय शाळा ही अनेक दिवसापासून नादुरुस्त आहे, या शाळेची पटसंख्या १६९ एवढी असून सदर शाळा बऱ्याच कारणांनी नादुरुस्त अवस्थेत आहे,तरीही त्यात विद्यार्थी शिक्षण घेत असून सदर शाळेची दुरुस्ती व्हावी, यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांनी ता १८ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे.निवेदनात नमूद केले की १२ ऑगस्ट २०२१ रोजी शाळे कडे जाणाऱ्या व्हरांड्यातील स्लॅब अचानकपणे कोसळला, त्यावेळी आपल्या कार्यालयाकडे सदर घटनेची माहिती दिली.

तसेच आठ दिवसापूर्वी सुद्धा वर्ग सुरू असताना एका विद्यार्थ्यांच्या अंगावर स्लॅबचा थोडासा भाग पडला होता, त्यामुळे सदर विद्यार्थी किरकोळ जखमी झाला. शाळा नादुरुस्त असल्याने भविष्यात एखादा मोठा अनर्थ घडू शकतो, तर पावसाळ्यात पावसाचे पाणी शाळेच्या प्रांगणात मोठ्या प्रमाणात साचत असून ते वर्गखोल्यातही जाते.स्लॅब जीर्ण झाल्याने त्यामधून विद्यार्थ्यांच्या अंगावर बऱ्याचदा पाणी झिरपते,शाळेच्या शेजारील खुल्या जागेत घाण कचरा टाकला जात असल्याने विद्यार्थ्यांना दुर्गंधीयुक्त वातावरणात धडे गिरवावे लागतात. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने बऱ्याचदा वर्गखोल्यात अंधार होतो, शाळेत महिला शिक्षिका आहेत, परंतु शाळेतील शौचालय व प्रसाधनगृह हे मोडकळीस आल्याने त्यांची कुचंबणा होते, तरी संबंधितांनी या अडचणींचा विचार करून लवकरात लवकर सदर शाळेची शिकस्त इमारत पाडून नवीन इमारत बांधली जावी. यापूर्वी १३-८-२०२१व ७-१०-२०२१ रोजी याबाबत निवेदन देण्यात आले होते. तसेच ग्रामपंचायतीकडून शाळा शिकस्त झाल्याचे प्रमाणपत्रही देण्यात आले.यासंदर्भातील निवेदन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुकीम बागवान व सदस्य तसेच पालक यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जि प वाशिम यांना दिले असून या निवेदनावर प्रतिलिपी म्हणून जिप अध्यक्ष वाशिम, पंचायत समिती सदस्य मालेगाव ते आहेत.ता १८ रोजी जि प उपाध्यक्ष डॉ शाम गाभणे यांनीही सदर शाळेची पाहणी केली.यावर काय निर्णय घेतल्या जातो याकडे शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.