अकोला - दिवाळीच्या काळात एसटी आणि रेल्वे फुल्ल असल्याचा फायदा खासगी बसचालक घेत आहेत. परिवहन विभागाच्या नियमाप्रमाणे एसटी तिकीट दराच्या तुलनेत ५० टक्के अधिक दर घेण्याची मुभा खासगी बसचालकांना दिली आहे. प्रत्यक्षात एसटीच्या तुलनेत दुप्पट तर काहीवेळा तिप्पट दर आकाराला जात आहे. दिवाळीच्या तोंडावर पुण्या-मुंबईवरुन गावी येणाऱ्यांची आर्थिक लूट खासगी बसचालकांकडून केली जात आहे.