Maha Shivratri 2024 : महाशिवरात्रीच्या पर्वावर पळशी मध्ये बनला १० क्विंटलचा ‘महारोठ’

बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पळशी झाशी (ता.संग्रामपूर) येथील शंकरगीर महाराज मंदिरात महाशिवरात्रीच्या पर्वावर महारोठ तयार केला जातो.
maha shivratri festival maharoth prasad of 10 quintals made in Palashi
maha shivratri festival maharoth prasad of 10 quintals made in PalashiSakal
Updated on

पळशी झाशी : बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पळशी झाशी (ता.संग्रामपूर) येथील शंकरगीर महाराज मंदिरात महाशिवरात्रीच्या पर्वावर महारोठ तयार केला जातो. ही शेकडो वर्षाची परंपरा असून हा कुठलाही चमत्कार नसून महाराजाच्या तपश्चर्या चे फळ मानले जाते.

सुकामेवा, दूध, तूप व इतर खाद्यपदार्थांच्या मिश्रणातून हा रोठ आकाराला येतो. महाशिवरात्री च्या रात्री गावातील तरुणांच्या मदतीने आणि हर हर महादेवाच्या गजरात हा भला मोठा आगळावेगळा महारोठ तयार करून रात्रीच रानगोवऱ्याच्या आहारात भाजण्यासाठी घातला जातो. केळीच्या पानात गुंडाळून त्याला राखेत ठेवून तयार केले जाते.

दुसरे दिवशी सूर्योदय पूर्वी हा महारोठ राखेतून बाहेर काढून भावीकाना प्रसाद म्हणून दिवसभर वितरित करण्यात येतो. यंदा ही १० क्विंटल ७० किलो वजनाचा हा महारोठ साकारला गेला. याचा पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी लाभ घेतला.असा महारोठ राज्यात वा इतर कुठेही तयार होत असल्याचे ज्ञात नाही हे विशेष!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.