अकोला : महाराष्ट्रात दीड कोटीहून अधिक छोटे व्यापारी आहेत. मात्र, चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या ई-व्यवसायामुळे त्यापैकी जवळपास २५ टक्के छोटे उद्योग गेल्या पाच वर्षात बंद झाले असून, उर्वरित ७५ टक्के व्यापारी सुद्धा अडचणीत आहेत. त्यांना उभारी देण्यासाठी व उद्योग विकासाच्या वाटा सूलभ करण्यासाठी लवकरच ‘आत्मनिर्भर’ ॲप उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र चेम्बर ऑफ काॅमर्स ॲण्ड इंडस्ट्री मुंबईचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले. शहरातील खंडेलवाल भवन येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते.
सध्या ऑनलाइन खरेदीकडे नागरिकांचा कल प्रचंड वाढला असून, कोट्यवधीची उलाढाल ई-व्यवसायातून होत आहे. मात्र, काही ई-व्यावसाईक कंपन्या चुकीच्या धोरणांचा अवलंब करत असल्याने महाराष्ट्रासह देशातील कोट्यवधी छोट्या व्यापाऱ्यांना त्याचा जबर फटका बसत आहे. नव्हे तर, या कंपन्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे जवळपास २५ टक्के छोटे व्यवसाय बंद पडले असून, उर्वरित ७५ टक्के व्यवसाय सुद्धा अडचणीत आहेत. ई-व्यवसायाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असताना, येथील छोट्या व्यवसाईकांकडे अजूनही नवतंत्रज्ञानाचा अभाव असल्याने, त्यांना उद्योगाच्या शर्यतीत उभे राहणे कठीण बनले आहे.
ही बाब लक्षात घेता व महाराष्ट्रासह देशभरातील छोट्या व्यापाऱ्यांना तंत्रज्ञाची ताकद देऊन उभारी देण्यासाठी महाराष्ट्र चेम्बर ऑफ काॅमर्स ॲण्ड इंडस्ट्रीने ‘आत्मनिर्भर’ ॲपची निर्मिती केली असून, सर्वप्रथम महाराष्ट्रापुरतेच हे ॲप उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती यावेळी ललित गांधी यांनी दिली. यातून छोट्या व्यापाऱ्यांसह ग्राहकांना लाभ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला विदर्भ चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अकोलाचे नवनिर्वाचीत अध्यक्ष निकेश गुप्ता, राहुल गोयनका आदी उपस्थित होते.
छोट्यात छोट्या व्यापाऱ्यांची माहिती ठेवू : निकेश गुप्ता
जिल्ह्यात १२ हजाराहून अधिक छोटे व्यापारी आहेत. परंतु, त्यांचेपैकी केवळ २५ टक्के व्यापाऱ्यांनीच परवानाधारक असून, ७५ टक्के लोकांची नोंदणी नसल्याने, त्यांची कोठेही माहिती उपलब्ध नाही. मात्र, विदर्भ चेम्बर ऑफ कॉमर्सद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक व्यापाऱ्यांची माहिती ठेवल्या जाईल व त्यांच्या उद्योगाचा पाया मजबूत करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी माहिती यावेळी विदर्भ चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अकोलाचे नवनिर्वाचीत अध्यक्ष निकेश गुप्ता यांनी यावेळी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.