अकोला : जिल्ह्यात जून ते जुलै २०२४ दरम्यान झालेल्या अति पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त दहा हजार ५०६ शेतकऱ्यांसाठी शासनाने १२ कोटी ९० लाख १७ हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे. याबाबतचा शासनादेश राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने जारी केला.
गतवर्षी जुलै महिन्यात सुरु झालेल्या अतिवृष्टी व नंतर अवकाळी पावसाचा मुक्काम एप्रिल महिन्यातही संपला नाही. गत खरीप हंगामाात अतिवृष्टीमुळे १ लाख ६८ हजार ९३७.१ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले हाेते. त्यानंतर नाेव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील एक लाख ८९ हजार ६८१ हेक्टरवर पिकं बाधित झाली. फेब्रुवारी महिन्यातही अवकाळीमुळे ९ हजार १५२ हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाली.
९ एप्रिल नंतर १० व ११ एप्रिल राेजीही गारपीट व अवकाळी पावसाचा पिकांना फटका बसला. दरम्यान यंदाच्या खरीप हंगामात सुद्धा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानग्रस्त क्षेत्राचे महसूल, ग्रामविकास व कृषी विभागामार्फत संयुक्त पंचनामे करून सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर मदतीची मागणी शासनाकडे करण्यात आली.
त्यानुसार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने १२ कोटी ९० लाख १७ हजार रुपये मंजूर केले आहेत. त्याचा फायदा दहा हजार ५०६ शेतकऱ्यांना मिळेल. जून ते जुलै २०२४ मध्ये नऊ हजार ४७१.५६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आता मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
असे झाले होते नुकसान
तालुका गाव शेतकरी निधी (लाखात)
बार्शीटाकळी ५८ २३७० १९८.३९
अकोला ६८ ६६३३ ८४८.८५
मूर्तिजापूर ८ ४७१ १६.०७
पातूर १४ १००८ २२४.३०
अकोट ४ २४ ३.०३
एकूण १५२ १०५०६ १२९०.६४
अशी आहे स्थिती
या पिकांचे नुकसान ः कपाशी, सोयाबीन, तूर
नुकसानग्रस्त गावे ः १५२
नुकसानग्रस्त शेतकरी ः १०५०६
नुकसानग्रस्त क्षेत्र ः ९४७४.३७
निधी मंजूर ः १२ कोटी ९० लाख ६४ हजार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.