वऱ्हाडातील १८ हजार ग्राहकांची ‘बत्ती गूल’!

BJP protested against MSEDCL collecting electricity bills from farmers
BJP protested against MSEDCL collecting electricity bills from farmersesakal
Updated on

अकोला : वऱ्हाडात येणाऱ्या अकोला, बुलडाणा आणि वाशीम या तीन जिल्ह्यांतील बड्या वीज ग्राहकावर महावितरणने ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला. यात सुमारे १८ हजार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. या वीज ग्राहकांकडे महावितरणची तब्बल ४२ कोटी रुपयांची थकबाकी होती.

वीज देयकांची १० हजार रुपयांपेक्षा अधिक रकम थकीत असलेले वीज ग्राहक महावितरणच्या रडारवर आहे. अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यात अशा ग्राहकांची ‘बत्ती गूल’ करण्याचे मोहीमच महावितरणने उघडली आहे. तिन्ही जिल्ह्यात ५३ हजार ३९० वीज ग्राहकांकडे ११३ कोटी ६६ लाख रुपयांची थकबाकी आहे. यात अकोला जिल्ह्यात २० हजार ४१५ वीज ग्राहकांकडे ४४ कोटी ११ लाख रुपये, बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक २५ हजार ५८७ वीज ग्राहकांकडे ५१ कोटी ७६ लाख रुपये, वाशीम जिल्ह्यात सात हजार ३८८ वीज ग्राहकांकडे १७ कोटी ७९ लाख रुपयांची थकबाकी आहे.

BJP protested against MSEDCL collecting electricity bills from farmers
तरुण वयातच सतावतोय मूत्रपिंड; अशी घ्या काळजी

अकोला शहर उपविभाग क्रमांक एकमध्ये तीन हजार ७१२ वीज ग्राहकांकडे आठ कोटी ५३ लाख रुपयांची थकबाकी होती. यातील ७१६ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा तोडण्यात आला आहे. या वीज ग्राहकाकडे दोन कोटी २१ लाख रुपयांची थकबाकी आहे. अकोला शहर उपविभाग दोन आणि तीनमध्ये अनुक्रमे दोन हजार १४९ आणि एक हजार ४८८ वीज ग्राहकाकडे ११ कोटी २६ लाख रुपयांची थकबाकी आहे.

यातील उपविभाग क्रमांक दोनमध्ये ४८६ आणि उपविभाग क्रमांक तीनमध्ये ४९७ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. अकोला ग्रामीण उपविभागात ६६ वीज ग्राहकांकडे एक कोटी ५१ लाख रुपयाची थकबाकी असल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. बाळापूर उपविभाग ३८९ वीज ग्राहकांचा, बार्शीटाकळी उपविभागात ४२२ वीज ग्राहकांचा, मूर्तिजापूर उपविभागात ४६८ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

शेजारून वीज घेतली तर फौजदारी

वीज देयकाच्या थकबाकीमुळे पुरवठा खंडित करण्यात आलेले ग्राहक आकडा टाकून अथवा शेजाऱ्याकडून वीज पुरवठा घेण्याची शक्यता आहे. ते बघण्यासाठी महावितरणने पथक नियुक्त केले आहे. असे ग्राहक आढळल्यास थेट वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा महावितरणकडून देण्यात आला आहे.

एकाच दिवशी ९५८ ग्राहकांचा पुरवठा खंडीत

केवळ मोठेच नाही तर लहान रक्कम थकबाकीदार वीज ग्राहकांच्या विरोधातही महावितरणकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे. गुरुवार, ता. १६ सप्टेंबर या एकाच दिवशी एकट्या अकोला जिल्ह्यात ९५८ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()