Market Committee : कृउबा संचालकासह १६ जणांवर गुन्हे दाखल; सुरक्षा रक्षक नसताना वेतनाची काढली खोटी बिले

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या ३२ लाखांचा अपहारप्रकरणी सभापती, सचिव व संचालकांसह १६ जणांवर आज (ता. १० ) रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. खामगाव बाजार समितीत सुरक्षा रक्षक कामावर नसताना त्यांच्या वेतनासाठी तब्बल ३२ लाखांची खोटी बिले काढण्यात आली होती.
Market Committee
Market Committeesakal
Updated on

खामगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या ३२ लाखांचा अपहारप्रकरणी सभापती, सचिव व संचालकांसह १६ जणांवर आज (ता. १० ) रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. खामगाव बाजार समितीत सुरक्षा रक्षक कामावर नसताना त्यांच्या वेतनासाठी तब्बल ३२ लाखांची खोटी बिले काढण्यात आली होती.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव बाजार समितीत सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या सम्यक साक्षी सेक्युरिटी अॅन्ड लेबर कंत्राटदार राहुल बुध्दम अबगड रा. वाडी यांनी शहर पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमुद आहे की, स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील काही संचालक व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला.

केवळ कागदोपत्री सुरक्षा रक्षकांची ड्यूटी दर्शवून वाढीव देयके सादर करण्यास भाग पाडले. सुरक्षा रक्षकांना प्रत्यक्ष कामावर न ठेवता त्यांच्या पगारासाठी एकूण ३१ लाख ६७ हजार ५१० रुपयांची बिले काढली. या एवढ्या रकमेचा अपहार करण्यात आला आहे. यासाठी अबगड यांच्यावर दबाव आणून त्यांच्या नावावर देयक बनविण्यात आले.

या अपहारानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभेत या देयकांना मंजुरी देण्यात आली असून सर्व पैसे सभापती, सचिव व संचालकांनी वाटून घेतले. संचालकांनी माझी फसवणूक केली असून भविष्यात सुद्धा खोटी बनावटी देयके सादर करण्यास त्यांना भाग पाडले जाऊ शकते असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यांच्यावर दाखल झाले गुन्हे

सभापती सुभाष लक्ष्मण पेसोडे, संचालक गणेश संभाजी माने, गणेश मनोहर ताठे, श्रीकृष्ण महादेव टिकार, विलाससिंग सुभाषसिंग इंगळे, प्रमोद श्यामराव चिंचोळकर, संजय रमेश झुनझुनवाला, मंगेश नामदेव इंगळे, सचिन नामदेव वानखेडे, किंमत रामा कोकरे, सौ. सुलोचना श्रीकांत वानखेडे, सौ. वैशाली दिलीप मुजुमले, सचिव गजानन आमले, कर्मचारी प्रशांत विश्‍वपालसिंग जाधव, निरिक्षक विजय इंगळे, रोखपाल गिरीश सातव यांच्यासह १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.