राज्यमंत्री बच्चू कडू यांची महावितरणच्या अधिकाऱ्याला धमकी; म्हणाले...

Minister of State Bachchu Kadu threatens MSEDCL official
Minister of State Bachchu Kadu threatens MSEDCL officialMinister of State Bachchu Kadu threatens MSEDCL official
Updated on

संग्रामपूर (जि. बुलडाणा) : राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) हे शेतकऱ्यांसाठी नेहमी आंदोलन करतात. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी धावून जातात. यामुळे शेतकऱ्यांचा नेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. याचा त्यांनी पुन्हा प्रत्यय दिला. विद्युत जोडणी न केल्यामुळे त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्याला फोनवरून थोबाडीत मारण्याची धमकी (threat) दिली. (Minister of State Bachchu Kadu threatens MSEDCL official)

राज्याचे कामगार, शिक्षण, जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) हे शनिवारी (ता. २८) बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात रुग्णवाहिकेच्या लोकार्पणासाठी आले होते. यावेळी त्यांनी स्थानिक तहसीलदारांच्या निवासस्थानी त्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या.

Minister of State Bachchu Kadu threatens MSEDCL official
इंडिगोला दणका! अपंग मुलाला प्रवेश नाकारल्यानं ५ लाखांचा दंड

संग्रामपूर येथील रामेश्वर नायसे हे घरावरून गेलेले उच्चदाब विद्युत वहिनीचे तार हलवण्यासाठी दोनवेळा विद्युत वितरण कंपनीकडे पैशांचा भरणा केला. स्वतः सुद्धा काही काम करून घेतले. परंतु, विद्युत वितरण कंपनीचे स्थानिक अभियंता हे काम करून द्यायला तयार नाहीत, असे बच्चू कडू यांना सांगितले.

यावर बच्चू कडू यांनी संबंधित अभियंत्याला फोन लावून उच्चदाब वाहिनीचे खांब व तार हलवण्याचे काम तात्काळ करा. संबंधित प्रकार हा धोक्याचा आहे. रहदारीच्या ठिकाणी आणि घरावरून उच्चदाब वाहिनीचे तार गेल्यामुळे अपघात होऊ शकतो. लोकांच्या जिवावर हा प्रकार येऊ शकतो. जीवित हानी होऊ शकते. म्हणून उच्चदाब वाहिनीचे तार व खांब हलवण्याचे काम तुम्ही लवकरात लवकर करून द्या असे म्हटले.

Minister of State Bachchu Kadu threatens MSEDCL official
हिजाब वाद : कर्नाटकात विद्यार्थिनींना वर्गात जाण्यापासून रोखले

यावर संबंधित अभियंत्यांनी थोड्या तिरपट शब्दात उत्तर दिले. यामुळे बच्चू कडू (Bachchu Kadu) चांगलेच संतापले. त्यांनी ‘संबंधित विषयांचे काम लवकर करून द्या अन्यथा तुम्हाला थोबाडीत मारावी लागेल’ असे संबंधित अभियंत्याला सुनावले. पाच पाच वर्ष काम करीत नाही. तुम्हाला जोडणी करायला फुर्सद नाही. कोण अभियंता आहे तो. आज-उद्यापर्यंत काम करून द्या, असे फोनवर बच्चू कडू (Bachchu Kadu) अधिकाऱ्याला म्हणाले. यानंतर ते पुढच्या दौऱ्यासाठी अकोल्याकडे निघून गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()