Akola Crime : अल्पवयीन मुलीचा विनयभंग; प्रशिक्षकाला पाच वर्षांची सक्तमजुरी

आरोपी हा तिला व्यायाम करण्याचे बहाण्याने व कोचिंग क्लासमध्ये ती एकटी असतांना विचित्र पध्दतिने स्पर्श करुन वारंवार विनयभंग करीत होता
minor girl molested tennis coaching coach sentence 5 years forced labor akola crime
minor girl molested tennis coaching coach sentence 5 years forced labor akola crimeesakal
Updated on

अकोला : अल्पवयीन मुलीला टेबल टेनिस कोचिंग क्लासला खेळायला जायची त्याठीकाणी आरोपी हा तिला व्यायाम करण्याचे बहाण्याने व कोचिंग क्लासमध्ये ती एकटी असतांना विचित्र पध्दतीने स्पर्श करुन वारंवार विनयभंग करीत होता.

याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी. गोगरकर यांच्या न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत पाच वर्षाची सक्तमुजरी आणि दंडाची शिक्षा ठोठावली. फिर्यादीची १२ वर्षाची अल्पवयीन मुलीला आरोपी महेंद्र चंद्रप्रकाश कोठारी यांचे टेबल टेनिस कोचिंग क्लासला खेळायला जायची.

त्याठीकाणी आरोपी हा तिला व्यायाम करण्याचे बहाण्याने व कोचिंग क्लासमध्ये ती एकटी असतांना विचित्र पध्दतिने स्पर्श करुन वारंवार विनयभंग करीत होता. पीडित मुलीने ही बाब तिच्या आईल्या सांगितली.

तिच्या आईने ता.५ ऑक्टोबर २०१८ रोजी सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशन दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ३५४, ३५४ (अ), पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. तपास एपीआय सुनील साळुंके यांनी केला.

दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी. गोगरकर यांच्या न्यायालयात सरकार पक्षाने गुन्हा सिध्द होण्याकरिता एकूण सहा साक्षीदार तपासले. आरोपीने त्याचे बचावाकरिता एक साक्षीदार तपासला.

सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य माणून न्यायालयाने आरोपी आरोपी महेंद्र चंद्रप्रकाश कोठारी (५०, रा. एसबीआय कॉलनी नं. १, जठारपेठ) यास पॉक्सो कायद्याचे कलम ९ व १० अंतर्गत दोषी ठरवून ५ वर्षे सक्त मजुरी व ३ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद,

कलम ३५४,३५४ अ अंतर्गत दोषी ठरवुन ३ वर्षे सक्त मजुरी व २ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. सदर प्रकरणात जिल्हा सरकारी वकील ॲड. आर. आर. देशपांडे, ॲड. मंगला पांडे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. पैरवी अधिकारी एएसआय. श्रीकांत गावंडे यांनी सहकार्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.