Akola News : बेपत्ता महिला पोलिसांना सापडली बुलडाणा जिल्ह्यात

अनैतिक मानवी वाहतूक कक्षाला बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीतून बेपत्ता झालेल्या एका मुलीला शोधण्यात यश मिळवले.
missing women of akola found in buldhana police action accused arrested
missing women of akola found in buldhana police action accused arrestedSakal
Updated on

Akola News : अनैतिक मानवी वाहतूक कक्षाला बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीतून बेपत्ता झालेल्या एका मुलीला शोधण्यात यश मिळवले. पीडिता ही बुलढाणा जिल्ह्यातील देउळगाव साकरशा येथे आरोपीच्या सोबत राहत होती.

अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने पीडितेसह आरोपी व लहान बाळाला बाळापूर पोलीसांच्या हवाली केले. बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीतून एक मुलगी बेपत्ता झाली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलीसांना माहिती मिळाली की गुन्ह्यातील पीडित मुलगी व आरोपी हे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव साकरशा येथे राहत आहेत.

त्यामुळे अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचे पोलिस देऊळगाव साकरशा येथे पोहोचले. याठिकाणी पीडित मुलीचा शोध घेतला असता पीडित मुलगी ही आरोपी याच्या घरी मिळून आली. त्यावर पीडित मुलीला गुन्ह्याबाबत सविस्तर माहिती देवून विश्वासात घेवून विचारपूस करण्यात आली.

missing women of akola found in buldhana police action accused arrested
Akola News : नॉन इंटरलॉकिंगच्या कामामुळे चौदा रेल्वेगाड्या रद्द

फिर्यादी यांना माहिती देवून पीडित मुलगी व आरोपी यांना सोबत घेवून पोलीस स्टेशन जानेफळ जिल्हा बुलढाणा येथे नेण्यात आले व जानेफळ पोलीसांना गुन्ह्याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर आरोपी, पीडित मुलगी, लहान बाळा यांना बाळापूर येथे आणून तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

१०९ प्रकरण उघडकीस

जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक संदीप घुगे तसेच अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक कक्ष महिला व बाल अत्याचारासंदर्भाने कलम ३६३, ३६६ (अ) भादंवि तसेच महिला बेपत्ता प्रकरणांचा तपास करत आहे. अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने आजपर्यंत एकूण ९७६ गुन्हे व ३३ बेपत्ता असे एकूण १०९ प्रकरणे उघडकीस आणले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.