संग्रामपूर (जि. खामगाव) : भूत, पंचभूत विकास करतील काय? की बाहेरचे येऊन विकास करतील, विकास फक्त संग्रामपूरची जनताच करेल, असे मत आमदार डॉ. संजय कुटे यांनी रविवारी (ता. १९) रात्री संग्रामपूरमध्ये (Sangrampur) व्यक्त केले. २१ डिसेंबरला नगर पंचायतीसाठी मतदान होणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेतून आमदार संजय कुटे (MLA Sanjay Kute) यांनी दोन्ही मंत्र्यांना टोला लगावला.
संग्रामपूर नगर पंचायतची निवडणूक सुरू असून, भारतीय जनता पार्टी स्वतंत्र लढत आहे. नगर पंचायतच्या १२ जागेवर भाजपने उमेदवार उभे केले आहेत. आतापर्यंत महाविकासआघाडी व प्रहार पक्षाची जाहीर सभा झाली. त्यामध्ये मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी आमच्या जिल्ह्यातील भूत येतेय तर मंत्री बचू कडू (Bachu Kadu) यांनी आम्ही पंचमहाभूत आहोत, असे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते.
आमदार डॉ. संजय कुटे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच दोन्ही मंत्र्यांचा समाचार घेतला. या मतदार संघाचा मी सक्षम आमदार आहे. मला ज्या जनतेने निवडून दिले ती जनताही सक्षम आहे. नगरपंचायतच्या विकासासाठी बाहेरील भूत किंवा पंचमहाभूतांची गरजच काय, असा सवाल आमदार कुटे यांनी उपस्थित केला. विकासाची भाषा न करता कॉमेडीतून विकास होईल का, असा प्रश्ननी त्यांनी केला.
पाहिजे तसा विकास झाला नाही
भूत व पंचभूत यांनी फक्त टाळ्या घेण्यासाठी भाषणे केलेली दिसतात. संग्रामपूर नगर पंचायतचा जळगाव व शेगाव सारखा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या १२ ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून भाजपच्या हाती सत्ता द्या (Give power to BJP). पाच वर्षांत संग्रामपूर शहराचा जो विकास व्हायला पाहिजे होता तो झाला नाही. स्वतः पुढाकार घेऊन रणांगणात उतरावे लागले असे त्यांनी सांगितले.
डोळ्यासमोर व्हिजन
डोळ्यासमोर व्हिजन ठेवून निवडणुकीला प्राध्यान दिले आहे. शेगाव तसेच जळगाव जामोद शहराचा ज्या प्रकारे सर्वांगीण विकास झाला त्याच धर्तीवर संग्रामपूर शहराचा विकास करण्याचे ध्येय ही आमदार संजय कुटे (MLA Sanjay Kute) यांनी नागरिकांसमोर मांडले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.