Murder : 'नाकाला लावला चिमटा' अन्.. नवऱ्याशी झालेल्या वादातून आईनेच घेतले चिमुकलीचे प्राण

Dhule News
Dhule News sakal
Updated on

Murder : नाकाला चिमटा लावून मुलगी झोपल्याचा बनाव आईने केला. पण, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये साडेपाच वर्षीय किशोरीच्या हत्येचा उलगडा झाला.

या प्रकरणात मंगळवारी खदान पोलिसांनी किशोरीची आई विजया हिला ताब्यात घेतले आहे. या विषयी किशोरीचे वडील रवी आमले यांनी दिलेल्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल केला.

Dhule News
Jain Muni Murder Case : मूकमोर्चाद्वारे मुनीश्रींच्या हत्येचा निषेध; जैन समाज एकवटला
Dhule News
Murder News : तुझी शेवटची इच्छा काय आहे? मुलाने रसगुल्ला सांगितला अन् केला त्याचा खून

बलोदे लेआऊट मधील ही घटना आहे. लग्नापासून पती-पत्नीमध्ये वाद होते. पत्नीने पतीला घटस्फोटाची मागणी देखील केली होती. या वादात किशोरीचा बळी गेल्याची चर्चा आहे. नाकाला चिमटा लावल्याने चिमुकल्या किशोरीचे प्राण गेले.

Dhule News
Murder Case : प्रेमसंबंध दुरावल्याच्या रागातून गोव्यातील तरुणीचा खून; 150 फूट खोल आंबोली घाटात फेकला मृतदेह

किशोरी नाकाला चिमटा लावून झोपली आणि तिचा मृत्यू झाला असा बनाव किशोरीच्या आईने केला होता. किशोरीच्या वडिलांनी आईवरच संशय व्यक्त केला होता. त्यांनी पोलिसांना त्याबाबत माहिती दिली होती. पोलिसांनी या प्रकरणात किशोरीचे पोस्टमार्टम केले आणि तपासात अनेक नव नवे खुलासे समोर आले.

Dhule News
Jain Muni Murder Case : मुख्यमंत्र्यांकडून भाजपची 'ही' मागणी मान्य; विधानसभेत केली मोठी घोषणा

यात नाकाला चिमटा लावून किशोरीचा मृत्यू झाल्याचे केलेला देखावा समोर आला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तर तिच्या अंगावर आणि शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्यात. या महिन्याच्या सुरुवातीला किशोरीच्या अकस्मात मृत्यूची नोंद खदान पोलिसांनी घेतली होती. किशोरीची आई विजया आमले हिच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला.

या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक धनंजय सायरे, पीएसआय निता दामधर, पोलिस कर्मचारी करंदीकर व आकाश राठोड काम पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.