Akola News : अन् कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात आले पैसे; सिड्स कंपनी झाली अलर्ट

दैनिक सकाळच्या बातमीची दखल सीड्स कंपनीला घ्यावी लागली
money deposits to accounts of onion producers farmer Sids Company alerted akola
money deposits to accounts of onion producers farmer Sids Company alerted akolaSakal
Updated on

देऊळगाव राजा : कांदा सीड्सचे जर्मिनेशन झाले नाही, म्हणून शेतकऱ्यांना कार्यालयाचे खेटे मारावयास लावणारी ईस्ट अँड वेस्ट सीड्स कंपनीने अखेर ठिय्या आंदोलनकर्ते शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले. अन् शेतकरी नेत्यांसह दैनिक सकाळच्या बातमीची दखल सीड्स कंपनीला घ्यावी लागली.

कांदा सीड्स देऊन सहा महिने उलटले तरीही ईस्ट अँड वेस्ट कंपनीने शेतकऱ्यांच्या कांदा बियाणांचा जर्मिनेशन केले नाही. म्हणुन बुधवारी रामनगर, वाढवणा, नांदखेडा, काचनेरा, गारखेड, भरोसा येथील शेतकऱ्यांनी शेतकरी नेते विनायक सरनाईक, माजी सरपंच संतोष भुतेकर, उद्धव थूट्टे,तानाजी चिकणेसिद्धेश्वर होरकळ, मधुकर उसर, संतोष थुट्टे, बद्रीनाथ तावरे आदी शेतकऱ्यांनी कंपनीच्या कार्यालयात ठिय्या मांडला.

money deposits to accounts of onion producers farmer Sids Company alerted akola
Pune News : सोसायटी रहिवाशी, स्थानिक ग्रामस्थांची PMRDAच्या आयुक्तांसोबत बैठक; विविध समस्या सोडविण्याचे आश्वासन

शेतकरी नेत्यांचे आंदोलन आणि एकमेव दैनिक सकाळने शेतकऱ्यांच्या सदर आंदोलना बाबत सविस्तर व परखडपणे वृत्त प्रकाशित केले. याची दखल घेत ईस्ट अँड वेस्ट कंपनीने आंदोलनकर्ते १७ शेतकऱ्यांना ३ लाख ८० हजार रुपये अदा केले. दरम्यान आंदोलनकर्ते शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

money deposits to accounts of onion producers farmer Sids Company alerted akola
Pune : ठाणे ,पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांना जोडणाऱ्या माळशेज रेल्वे मार्गाचा प्रश्न लवकर मार्गी लावा प्रवाशांची मागणी

कंपनीने तालुका व परिसरातील बाराशे शेतकऱ्यांना कांदा सीड्स प्लॉट दिले होते. त्यांच्याकडून कांदा सीड्स घेऊन जर्मिनेशन ला पाठविण्यात आले.आंदोलनकर्ते सर्व शेतकऱ्यांना कांदा सीड्स बद्दल रक्कम अदा करण्यात आली. कंपनीने सुमारे ९०% कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पैसे दिले असून उर्वरित शेतकऱ्यांना येत्या ५ ऑक्टोबर पर्यंत पूर्णतः रक्कम करारानुसार कंपनी अदा करणार आहे.

- भागवत पवार, एरिया मॅनेजर, ईस्ट अँड वेस्ट कंपनी, शाखा देऊळगाव राजा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()