आजपासून मॉन्सून सक्रिय; जोरदार पावसाचे संकेत

आजपासून मॉन्सून सक्रिय; जोरदार पावसाचे संकेत
Updated on

अकोला ः मॉन्सूनचे आगमन झाल असले तरी, अजूनपर्यंत पेरणीयोग्य पाऊस पडला नाही. त्यामुळे बहुतांश भागात पेरणीला सुरुवात झाली नाही. मात्र, बुधवारी (ता.२३) आकाश काळवंडल्याचे चित्र पाहायला मिळाले असून, आजपासून जिल्ह्यासह विदर्भ, खांदेश आणि मराठवाड्यात मॉन्सून सक्रिय होण्याचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत. त्यामुळे उद्यापासून सर्वत्र खरिपाची पेरणी जोर धरणार असल्याचे चिन्ह आहे. (Monsoon active from today; Signs of heavy rain)

मॉन्सून दरवर्षी भारत भेटीला येत असला तरी त्याचा प्रसार आणि मार्गक्रमण इतर देशाचे वातावरण नियंत्रित करीत असतात. बुधवारी (ता.२३) बऱ्याच अवधीनंतर, खांदेश, विदर्भ आणि मराठवाडा विभागात मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्ह दिसून आली आहेत. बंगालच्या उपसागरावर सक्रिय प्रणालीचा जोर ओसरत आहे. ही मॉन्सूनच्या सामान्य प्रगतीकरिता सकारात्मक परिस्थिती आहे. त्यानुसार आजपासून जोरदार पावसाच्या हजेरीची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

आजपासून मॉन्सून सक्रिय; जोरदार पावसाचे संकेत
धक्कादायक, सिझर करताना पोटात राहिली बँडेजची पट्टी



उपग्रहानुसार पावसाची स्थिती
२३ जूनच्या उपग्रह छायाचित्रानुसार, राज्यात नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव (राज्य सीमा परिसरातील सर्व तालुके), बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांसोबत औरंगाबाद, बीड, नगर, लातूर, नांदेड, तर पुणे विभागात सातारा (पुणे-सातारा सीमा परिसर, कराड तालुका), सोलापूर (सोलापूर, पंढरपूर तालुका), कोल्हापूर इत्यादी जिल्ह्यामध्ये व्यापक स्वरूपात (सर्व ठिकाणी) सोबत संपूर्ण कोकणात जोरदार पावसाची शक्यता दिसून येत आहे. खांदेश, भंडारा, गोंदिया जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू झाला असून, इतर ठिकाणी पुढील जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

आजपासून मॉन्सून सक्रिय; जोरदार पावसाचे संकेत
वाढीव पाणीपुरवठा योजनेत गैरप्रकार, शिवसेनेची मंत्र्यांकडे तक्रार



जमिनीवरील आर्द्रता ५० टक्क्यांच्या आसपास आहे. जमिनीपासून दीड-तीन किलोमीटर पर्यंत तेच प्रमाण ८० टक्के अधिक आहे. ही स्थिती सर्वदूर पाऊस बरसण्याकरिता पूरक आहे. तापमान २८ ते ३३ डिग्री सेल्सिअस दरम्यान आहे. पुढील २-३ दिवस ही परिस्थिती सक्रिय राहण्याचे अनुमान असून, आजपासून नमूद विभागात मॉन्सून पुन्हा सक्रिय होऊ शकतो.
- संजय अप्तुरकर, कृषी हवामान तज्ज्ञ, नागपूर

...तर पेरणी फायदेशीर
पुरेसा पाऊस बरसला (१०० मिमी), जमिनीत ओल १५-२० सेंटी मीटर आहे, ही खात्री करून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांनी पीक पेरणी करणे फायदेशीर ठरते. ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घेण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.


Monsoon active from today; Signs of heavy rain

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.