मॉन्सून पुन्‍हा होतोय सक्रिय! चार ते पाच दिवस पावसाचे संकेत

मॉन्सून पुन्‍हा होतोय सक्रिय! चार ते पाच दिवस पावसाचे संकेत
Updated on

अकोला : महाराष्ट्रात मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. पुढील चार ते पाच दिवस विदर्भात जोरदार तर अकोला जिल्ह्यासह अमरावती विभागात मध्यम ते जोरदार पावसाचे संकेत हवामान अभ्यासकांनी दिले आहेत.

यावर्षी योग्यवेळी मॉन्सूनचे आगमन व ९८ टक्के पर्जन्यमानाचे संकेत हवामान विभागाने दिले होते. सोबतच मध्यंतरी वेळोवेळी पावसाचा खंड सुद्धा राहणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार मॉन्सूनचे जूनच्या पहिल्या आठवड्यातच मॉन्सूनने हजेरी लावली परंतु, दोन ते तीन दिवसांनंतर दीर्घ दांडी मारली. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यानंतर मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला. यावेळी जोरदार हजेरी लावल्याने सरासरी सुद्धा गाठली. मात्र, आठ ते पंधरा दिवसांपासून पावसाने दडी दिली. आता पुन्हा मॉन्सून सक्रिय होत असल्याचे संकेत हवामान अभ्यासकांनी दिले आहेत.

मॉन्सून पुन्‍हा होतोय सक्रिय! चार ते पाच दिवस पावसाचे संकेत
सॉरी मित्रांनो, आता जगाला गुडबाय करण्याची वेळ
ओडिसा किनार पट्टीजवळ असलेले कमी दाबाचे क्षेत्र पुन्हा जोर पकडत आहे. या क्षेत्राचा विस्तार प्रामुख्याने तेलंगणा, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश सोबत महाराष्ट्रात सुद्धा पाऊस घेऊन येईल. हा कमी दाबाचा पट्टा पुढील अंदाजे ४-५ दिवस सक्रिय राहील. २९ ऑगस्टच्या सायंकाळपासून नागपूर आणि अमरावती विभागात गडगडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता. नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, वाशीम, अकोला, अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यात सर्वदूर तुरळक ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता.
- संजय अप्तुरकर, हवामान अभ्यासक, नागपूर

फवारणी आटोपली, पावसाचीच प्रतीक्षा

आठ ते पंधरा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांना खुरपणी, निंदणी, डवरणी व प्रामुख्याने कीडनाशक, तणनाशक फवारणी करण्यासाठी वेळ मिळाला. सध्या बहुतांश भागात शेतकऱ्यांनी वरील कामे आटोपली असून, आता पुन्हा पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

मॉन्सून पुन्‍हा होतोय सक्रिय! चार ते पाच दिवस पावसाचे संकेत
विदर्भात सेनेला धक्का; शेखर सावरबांधे जाणार राष्ट्रवादीत!

अकोला जिल्ह्यातील २९ ऑगस्टपर्यंतचे पर्जन्यमान

  • तालुका.........पर्जन्यमान (मि.मी.)....टक्केवारी

  • अकोट.........४४०.९..................८०.५

  • तेल्हारा........५३९.६..................१०२.३

  • बाळापूर.......४४६.५..................८९.५

  • पातूर..........५७७.८..................८५.२

  • अकोला.......५३६.१..................९६.४

  • बार्शीटाकळी..५७७.०..................१०२.६

  • मूर्तिजापूर......५७५.५..................१००.९

  • एकूण सरासरी.५२३.९..................९३.३

जलाशयांनी गाठली सत्तरी

अकोला जिल्ह्यातील मुख्य जलाशयांमध्ये सध्या ७० टक्कांपेक्षा अधिक जलसाठा उपलब्ध झाला असून, त्यामध्ये प्रामुख्याने काटेपूर्णा धरण ९२.१७ टक्के, वाण धरण ७६.२३ टक्के, निर्गुणा १०० टक्के तर, मोर्णा धरण ७० टक्के भरले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()