अकाेला : मुंडगाव आरोग्य वर्धिनीत अनेक पदे रिक्त

पाच उपकेंद्रातही कर्मचाऱ्यांचा वणवा; रुग्ण सुविधापासून वंचित
Mundgaon health promotion Many Positions Empty
Mundgaon health promotion Many Positions Emptysakal
Updated on

वणी वारुळा : अकोट तालुक्यातील सर्वात मोठे आरोग्य वर्धिनी केंद्र म्हणून मुंडगाव आरोग्य वर्धिनी केंद्राकडे पाहिले जाते. परंतु, याच आरोग्य वर्धिनी केंद्रात तीन व आरोग्य वर्धिनी केंद्राच्या अंर्तगत येणाऱ्या पाच उपकेंद्रात आठ असे एकूण ११ महत्त्वाची पदे रिक्त असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य केंद्र व उपआरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांचा वणवा असल्यामुळे परिसरातील रुग्णांना सुविधा मिळत नसल्याची ओरड रुग्णांकडून होत आहे.(Mundgaon health promotion Many Positions Empty)

Mundgaon health promotion Many Positions Empty
नागपूर : लोकांच्या सांगण्यावरून गुंतवणूक नकोच

अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात मुख्यालय एएनएम, दोन परिचारक अशी, तीन पदे रिक्त आहेत. याच उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या बळेगाव उपकेंद्रातील आरोग्य सेवक, आकोलखेड उपकेंद्रातील एक एएनएम, एक परिचारक, पिंप्री उपकेंद्रातील एएनएम, उमरा उपकेंद्रातील दोन एएनएम व एक आरोग्य सेवक, जळगाव नहाटे उपकेंद्रातील एएनएम पद रिक्त आहेत.

Mundgaon health promotion Many Positions Empty
अहमदनगर जिल्ह्यातील प्रवाशांना १३३ बसद्वारे सेवा

विशेष म्हणजे उमरा व जळगाव नहाटे उपकेंद्रातील एएनएम ह्या प्रतिनियुक्तीवर कावसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करीत आहेत. आणि त्यांचे वेतन मात्र, मुंडगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात काढले जात असल्याचे आढळून आले आहे. रिक्त पदांमुळे अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या उपकेंद्रातून दुसऱ्या उपकेंद्रात रुग्णांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जावे लागत आहे. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

मुंडगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्रातील मुख्य असलेले एएनएम हेच पद रिक्त असल्याने आरोग्य वर्धिनी केंद्रात सेवा देण्यासाठी प्रत्येक दिवशी वेगवेगळे उपकेंद्रातील एएनएम यांना आपल्या उपकेंद्रा व्यतिरीक्त आरोग्य केंद्रात सेवा द्यावी लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने मुंडगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्र व त्या अंतर्गत येणाऱ्या पाच उपकेंद्रातील रिक्त असलेली सर्व पदे भरण्यात यावी अशी, मागणी सर्व आरोग्य केंद्राचा लाभ घेणाऱ्या नागरिकांकडून केल्या जात आहे.

Mundgaon health promotion Many Positions Empty
जळगाव शहरासह जिल्ह्यात धूलिकणांमुळे दृश्‍यमानता कमी

''मुंडगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात तीन व त्याअंतर्गत येणाऱ्या पाच उपकेंद्रातील नऊ असे, एकूण ११ पदे रिक्त आहेत.''

-डाॅ.स्नेहल कोठे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, मुंडगाव,

''आरोग्य वर्धिनी केंद्र व उपकेंद्रातील पदे रिक्त असल्याने रुग्णांना पुरेशी सेवा मिळत नाही. त्यामुळे शासनाने रिक्त पदे त्वरित भरावी.''

-संजय वानखडे, नागरिक, जळगाव नहाटे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.