Akola Akot Train Fair: अकोट-अकोला प्रवास भाडे आता फक्त १० रुपये, ‘अकोला-अकोट डेमू’ ट्रेनच्या तिकीट दरात कपात

आगामी लोकसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारने पॅसेंजर ट्रेनने (प्रवासी) दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा दिला असून भारतीय रेल्वेने प्रवासी गाड्यांच्या तिकीट दरात मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे.
Akola
AkolaEsakal
Updated on

Akola-Akot Train Travel Fair 10 rupees: आगामी लोकसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारने पॅसेंजर ट्रेनने (प्रवासी) दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा दिला असून भारतीय रेल्वेने प्रवासी गाड्यांच्या तिकीट दरात मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे.

त्यामुळे प्रवासी गाड्यांचे तिकीट दर कोरोनापूर्वीच्या पातळीवर परतले असून २ मार्च पासून अकोला-अकोट या डेमू ट्रेनमध्ये प्रवाशांना प्रवासी भाडे दहा रुपये आकारण्यात आले. प्रवाशांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेने हा निर्णय घेतला असल्याचे रेल्वे विभागाकडून बोलले जात आहे.

रेल्वे विभागाच्या वतीने २७ फेब्रुवारीपासून पॅसेंजर गाड्यांचे सामान्य द्वितीय श्रेणीचे भाडे पूर्ववत करण्यात आले आहे. रेल्वे विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या तिकीट कपातीच्या निर्णयामुळे तिकीटाची किंमत १० रुपयांवरून ३० रुपये करण्यात आली. हे तिकीट एक्सप्रेस गाड्यांच्या भाड्यानुसार होते.

मात्र नुकत्याच झालेल्या घोषणेनंतर ही किंमत अर्ध्यावर आली असून त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. सदर तिकीट दरामध्ये केलेली कपातीमुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र असे असताना २ मार्च रोजी दोन्ही स्थानकांवर वेगवेगळे दर आकारल्याने प्रवासी मात्र संभ्रमात पडले होते. (Latest Marathi News)

अकोट-अकोला प्रवास भाडे १० तर अकोला स्थानकावरून अकोटसाठी भाडे ३० रुपये आकारल्याने प्रवाशांचाही गोंधळ उडताना दिसला. अकोट-अकोला रेल्वे प्रवास भाडे आता कमी झाल्याने खासगी बसेस सह राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला चांगलचाच फटका बसणार असून रेल्वे प्रवासी संख्येत निश्चितच वाढ होणार आहे. अशातच फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची मागणी आता प्रकर्षाने पुढे आली आहे.

फुकट्या प्रवाशांचा भरणा अधिक
अकोट-अकोला प्रवास करताना काही जण फुकटच प्रवास करताना दिसून येतात. तिकीट तपासणी करणारे संबंधित अधिकारी या ट्रेन मध्ये येत नसल्याचा फायदा घेत फुकट्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याची माहिती आहे.

Akola
Arvind Kejriwal: 8 समन्सनंतर केजरीवाल पहिल्यांदाच नमले! ईडीला उत्तर देण्यास तयार, दिली तारीख

तिकीट दाराबाबत प्रवाशांमध्ये संभ्रम
२ मार्च रोजी अकोट येथून निघालेल्या पहिल्या फेरी दरम्यान प्रवास भाडे १० रुपये आकारण्यात आले. मात्र अकोल्याहून अकोटला येताना ३० रुपये भाडे प्रवाशांना द्यावे लागले. एकच अंतर मात्र दोन्ही स्थानकावर वेगवेगळे दर आकारण्यात आल्याने प्रवाशांमध्ये मात्र संभ्रम बघायला मिळाला. (Latest Marathi News)

मात्र दोन्ही कडील भाडे एकसमान
अकोला रेल्वे स्थानकावरून अकोटसाठी २ मार्च रोजी प्रवास भाडे ३० रुपये आकारण्यात आले होते. मात्र ३ मार्च रोजी अकोट आणि अकोला या दोन्ही स्थानकांवर संबंधित शहरांना ये-जा करण्यासाठी प्रवासी भाडे प्रत्येकी दहा रुपये आकारल्याचे प्रवाशांनी सांगितले.

सध्याचे दर
- अकोट-अकोला बस प्रवास भाडे - ७० रुपये
- खासगी बस - ५० रुपये
- रेल्वे भाडे - १० रुपये

निवडणुकीच्या तोंडावर का होईना भाडे कमी झाल्याचे समाधान आहे. कोरोना काळ संपल्यावरही आम्ही प्रवासी आजवर पॅसेंजर गाड्यांऐवजी एक्स्प्रेस गाड्यांचे भाडे देत होतो.
- अशोक चौधरी, रेल्वे प्रवासी

तिकीट दर कमी झाल्याने प्रवाशांचा कल रेल्वे कडे वाढणार आहे. त्यामुळे आता तरी गाड्यांची संख्या दक्षिण मध्य रेल्वेने वाढवून प्रवाशांना दिलासा द्यावा.
- विजय जितकर, पूर्णा-अकोला-खंडवा, रेल्वे संघर्ष समिती सदस्य

Akola
Arvind Kejriwal: 8 समन्सनंतर केजरीवाल पहिल्यांदाच नमले! ईडीला उत्तर देण्यास तयार, दिली तारीख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.