अकोला वाहतूक शाखेने गर्दीच्या ठिकाणी लावले सूचना फलक

वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी उपक्रम
akola Transport Branch Notice boards in crowded places
akola Transport Branch Notice boards in crowded placessakal
Updated on

अकोला : वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी शहर वाहतूक (Transportation) नियंत्रण शाखेमार्फत मुख्य रस्त्यांवर सूचना फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन होणार नाही, सोबतच वाहन चालकांना सुद्धा कारवाईला सामोरे जावे लागणार नाही.

akola Transport Branch Notice boards in crowded places
नांदेड मारतळ्यात अवैध बायोडिझेलची विक्री

वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत महत्वासह व आवश्यक ठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहेत. त्यामध्ये रूंगठा पेट्रोलपंप, आंबेडकर नगर, पत्रकार कॉलोनीकडून बसस्थानकाकडे न वळता उजव्या बाजूला न वळता डावे बाजूला वळावे, चिवचिव बाजाराकडून उजवी बाजूकडे पोस्ट ऑफिसकडे न वळता स्वराज्य भवन बसस्थानकाकडे वळावे. टॉवर चौकाकडून जनता भाजी बाजाराकडे विरुद्ध बाजूने जावू नये याकरिता नो एंट्री वन-वे ट्राफीकचा सूचना फलक लावण्यात आला आहे. त्यासोबतच जनता भाजी बाजारासमोर मुख्य रहदारीच्या रोडवर वाहनाचे पार्किंग करू नये, अपघात व गाडीचे नुकसान होवू नये यासाठी नो पार्किंगचे सूचना फलक वाहतूक शाखेकडून लावण्यात आलेले आहे.

akola Transport Branch Notice boards in crowded places
औरंगाबाद : शहरात शनिवारपासून मालमत्तांचे सर्वेक्षण

अपघात होवू नये वाहतुकीचा खोळंबा होवू नये याकरिता वाहतूक नियंत्रण शाखेने सदर सूचना फलक लावले आहेत. यानंतर सुद्धा महत्वाच्या चौकात सूचना फलक लावण्यात येणार आहेत. नागरिकांनी सदर फलकवरील सूचनांचे पालन करने गरजेचे आहे, असे आवाहन वाहतूक शाखने केले आहे. अकोला महानगरात अपघात शून्य करण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.