डम्पिंग ग्राऊंड 'फुल्ल', कचरा घंटा गाड्या लागल्या महानगरपालिकेपुढे

डम्पिंग ग्राऊंड 'फुल्ल', कचरा घंटा गाड्या लागल्या महानगरपालिकेपुढे
Updated on

अकोला : शहरातील नायगाव परिसरातील डम्पिंग ग्राऊंडवर (Naigaon Dumping Ground) कचरा टाकण्यासाठी जागाच शिल्लक नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांशी कचरा टाकण्यावरून उद्‍भवत असलेले वाद बघता कचरा घंटा गाडी चालकांनी त्यांची वाहने अकोला मनपा कार्यालयासमोर उभी केली. अकोला शहरातून दररोज ११४ घंटा गाड्या व ३४ ट्रॅक्टरद्वारे दररोज २०० मेट्रिक टन कचरा संकलन केला जातो. हा कचरा शहरातील उत्तर झोनमध्ये येणाऱ्या नायगाव परिसरातील डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो. येथे कोणतेही प्रक्रिया कचऱ्यावर केली जात नसल्याने दररोज संकलीत होणारा कचरा येथेच साठून ठेवणे भाग आहे. अनेक वर्षांपासून हा कचरा येथेच टाकला जात असल्याने परिसरात कचऱ्याचा डोंगर उभा झाला आहे. (Naigaon dumping ground garbage bell carts started in front of Akola Municipal Corporation)

डम्पिंग ग्राऊंड 'फुल्ल', कचरा घंटा गाड्या लागल्या महानगरपालिकेपुढे
महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये ‘फ्री स्टाईल’, वाद पोलिसात

त्यातून सुटणारी दुर्गंधी, कचरा जाळला जात असल्याने निघणारे विषारी धूर यामुळे नायगाव परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच डम्पिंग ग्राऊंडपर्यंत मानवी वस्ती पोहोचली असल्याने डम्पिंग ग्राऊंडवर जाणाऱ्या कचरा गाड्यांची वरदळ सतत सुरू असते. ११४ घंटा गाड्यांच्या २२८ फेऱ्या व ३४ ट्रॅक्टरच्या ६५ फेऱ्या दररोज या भागातून होतात. आता येथील जागाही कमी पडू लागली आहे.

डम्पिंग ग्राऊंड 'फुल्ल', कचरा घंटा गाड्या लागल्या महानगरपालिकेपुढे
अजूनही येतो घुंगरांचा आवाज, “कंचनी”चा महालाचं गुढ आहे तरी काय?

शहरातील जमा केलेला कचरा टाकावा तरी कुठे, असा प्रश्न घंटा गाडी चालकांना पडला आहे. त्यातून या डम्पिंग ग्राउंडवर कचरा खाली करताना घंटा गाडी चालकांना स्थानिक नागरिकांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. अनेकदा घंटा गाडी चालक व स्थानिक नागरिकांमध्ये या ठिकाणी वाद सुद्धा झाले आहेत. त्यामुळे त्रस्त झालेले घंटा गाडी चालक बुधवारी सकाळी नायगाव येथे कचराखाली करण्यासाठी जागाच नसल्याने त्यांची १०० च्या वर वाहने महानगपालिके समोर उभी केली. त्यानंतर त्यांना मनपा आयुक्तांची भेट घेवून यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली.

संपादन - विवेक मेतकर

Naigaon dumping ground garbage bell carts started in front of Akola Municipal Corporation

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.