Nalganga Dam Water Storage : पावसानंतर शेकडो गावांची तहान भागणार; नळगंगा प्रकल्पात ७३ टक्के जलसाठा

मोताळा तालुक्यातील नळगंगा धरणाचा जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पात समावेश आहे. या धरणातून मोताळा, मलकापुर व नांदुरा तालुक्यातील शेकडो गावातील नागरिकांची तहान भागविल्या जाते.
Nalganga Dam Water Storage
Nalganga Dam Water Storagesakal
Updated on

मोताळा : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नळगंगा धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. आज ५ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजेपर्यंत नळगंगा प्रकल्पात ७३.३८ टक्के इतका जलसाठा झाला आहे. त्यामुळे शेकडो गावांची तहान भागणार असून, परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मदत होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.