Akola News : २२ हजार मतदारांची नावे यादीतून वगळली; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले निवेदन

वंचितचा आरोप; सदर मतदार हे स्लम व उच्चवर्णिय वस्तीतील आहेत
names of 22 thousand voters missing  from list allegation vanchit party  district Election Officers akola
names of 22 thousand voters missing from list allegation vanchit party district Election Officers akolaSakal
Updated on

अकोला : लोकसभा मतदारसंघातून २२ हजार मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नावे निवेदन देण्यात आले आहे. याबाबत त्वरीत कार्यवाही करण्यात करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही वंचितने दिला आहे.

निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे की सन् २०२४ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अकोला लोकसभा मतदारसंघातील जवळपास २२ हजार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.

सदर मतदार हे स्लम व उच्चवर्णिय वस्तीतील आहेत. संबंधितांची नावे जाणिवपूर्वक वगळण्यात आल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. बीएलओ यांनी सत्ताधारी राजकीय पक्षाच्या दबावात येऊन एका वस्तीतील मतदार हा दुसऱ्या वस्तीत टाकून दिशाभूल केल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.

बीएलओ यांनी जाणीवपूर्वक वस्त्यांमध्ये बदल करून २२ हजार मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा वंचितने केला आहे. मतदारांना प्रत्यक्ष न भेटता एका ठिकाणी बसून तसेच घराला लॉक असल्याचे दाखवून किंवा इतर कारणे दाखवून बीएलओ यांनी नावे वगळण्याचे काम केल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.

दरम्यान सदर चूक दुरूस्त करण्यासाठी त्वरीत २२ हजार मतदारांचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात यावे व मतदारांची नावे पूर्ववत करण्यात यावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी अधिनियम १९४९ कलम ३२ नुसार याबाबत न्यायालयात दाद मागून तीव्र आंदोलन करेल,

असा इशारा वंचितने दिला आहे. निवेदन देते वेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलींद इंगळे, गजानन गवई, सहजिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास सदांशिव, नितीन सपकाळ, पक्षीराज चक्रनारायण व इतरांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.