संग्रामपूर (बुलढाणा) - जळगाव जामोद मतदार संघात आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर राजकीय वातावरण तापत आहे. या मध्ये सत्ताधारी भाजपा महायुती सरकारच्या विरुद्ध विरोधक आंदोलनाच्या माध्यमातून आक्रमक भूमिका घेतांनाही दिसत आहेत.
राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यापूर्वी उभारलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा एकाकी कोसळला. दरम्यान पुतळ्याचा कामात सरकारने भ्रष्टाचार केला असून यामुळे शिवरायांचा अवमान झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बुधवारी भाजपा, महायुती सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन निषेध व्यक्त केला.