अकोला : विद्यामान तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील एम. पाटील यांनी चुलत भाचा रवि तात्याराव सोनोने याची हत्या करणारा चुलत मामा देवानंद सुखदेव गवई याच्यासह चुलत मामी प्रमिला उर्फ मंदा देवानंद गवई (रा. धाकली, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला) यांना बुधवारी (ता. २७) जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
घटनेची हकीकत अशी की, ग्राम धाकली येथील आरोपी देवानंद सुखदेव गवई व प्रमिला उर्फ मंदा देवानंद गवई यांच्या शेजारी आरोपी देवानंदची चुलत बहिण कमलाबाई तात्याराव सोनाने तिच्या परिवारासह राहत होती. तिचा भाऊ विठ्ठल बेंदराजी गवई नोकरीवर असल्याने त्यांची शेती वाहिती करत होती.
ती धाकली येथे येण्यापूर्वी सदर शेत आरोपी देवानंद वाहिती करत होता. आरोपीला वाहिती करिता मिळू शकणारी शेती कमलाबाई वाहिती करित असल्याने आरोपीच्या मनात कमलाबाईच्या परिवाराबाबत राग होता. त्यातून त्यांचे नेहमीच वाद होत होते. दिवसेंदिवस आरोपीच्या मनात असलेला राग वाढत गेला व त्यातूनच सदर हत्याकांड घडले.
दोन्ही पती पत्नी आरोपींनी २५ जून २०१९ रोजी दुपारी १ वाजताचे दरम्यान संगनमत करुन फिर्यादी कमलाबाईचा मुलगा रवि तात्याराव सोनोने याच्या डोक्यावर लाकडी काठीने व कांडक्याने मारुन त्याला गंभीर जख्मी केले.
त्यात चुलत भाचा रविचा मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणी बार्शीटाकळी पोलिस स्टेशन येथे आरोपींविरुध्द भादंविचे कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज वासाडे यांनी करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
प्रकरणामध्ये सरकार पक्षाने गुन्हा सिध्द करण्यासाठी एकूण सात साक्षिदार तपासले. बचावपक्षा तर्फे एक साक्षिदार तपासण्यात आला. सरकार पक्षाचे पुरावे ग्राह्य मानून दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना भादंविचे कलम ३०२,
३४ अंतर्गत दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडांची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त ३ महिने सश्रम कारावास भोगावा लागेल, अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील आनंद गोदे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.