बच्चू कडू यांच्या आरोपानंतर अधिकाऱ्यांची होणार चौकशी

बच्चू कडू यांच्या आरोपानंतर अधिकाऱ्यांची होणार चौकशी
Updated on

अकोला ः जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा किराणा दुकानांमधून विकला जात असताना अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे या विभागाचे अधिकारी, कर्मचारी खाबुगिरीत व्यस्त असल्याचा आरोप पालकमंत्री बच्चू कडू यांनी अकोला जिल्ह्यात गुटखा विक्रेत्यांविरुद्ध वेशांतर करून केलेल्या कारवाईदरम्यान केला होता. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे. या खात्याचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. (Officials will be questioned after Bachchu Kadu's allegations)

बच्चू कडू यांच्या आरोपानंतर अधिकाऱ्यांची होणार चौकशी
आठवडाभरातच पुन्हा लॉकडाउन, आता चारच्या आत घरात


पालकमंत्री बच्चू कडू यांनी अकोला जिल्ह्यात विविध ठिकाणी पाहणी करून प्रतिबंधित गुटखा मिळत असल्याचे उघडकीस आणले होते. अकोला जिल्ह्यात अनेक पाणपट्ट्यांवर त्यांना प्रतिबंधित गुटखा विकत मिळत असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी थेट अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व पोलिस या लोकांकडून हफ्ते घेत असल्याचा आरोप केला होता.

बच्चू कडू यांच्या आरोपानंतर अधिकाऱ्यांची होणार चौकशी
कोरोनाने 404 महिलांच्या कपाळावरील पुसले कुंकू

हे आरोप अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी गांभिर्याने घेत अकोल्यातील अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले. जर चौकशीत दोषी आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही डॉ. शिंगणे यांनी स्‍पष्ट केले आहे.

Officials will be questioned after Bachchu Kadu's allegations

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.