शिरपूर : शिरपूर जैन ही वाशीम जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. २५ हजाराच्यावर शहराची लोकसंख्या आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची सतरा कोटी रुपये खर्च करून सुसज्ज इमारत बांधण्यात आली आहे व आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये रूपांतर सुद्धा करण्यात आले आहे. मात्र, येथील आरोग्यवर्धिनी केंद्रास रिक्त पदांचे ग्रहण लागले असून, सुमारे ५२ हजार लोकांची आरोग्यसेवा २१ कर्मचारी व एक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरवशावर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, शिरपूर जैन येथील आरोग्यवर्धिनी केंद्रांतर्गत सुमारे ३३ खेड्याचा अंतर्भाव आहे. आठ उपकेंद्रांमार्फत ही आरोग्य सेवा बहाल केली जाते. यामध्ये शिरपूर-भाग एक, भाग दोन, भाग तीन, करंजी, वसारी, खंडाळा, शिरसाळा, चीवरा या उपकेंद्रांतर्गत शिरपूरसह ३३ खेड्यातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यात येते. येथील आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये १६ आरोग्य कर्मचारी, तीन सुपरवायझर, एक फार्मासिस्ट, असे २१ कर्मचारी व एकमेव वैद्यकीय अधिकारी डॉ. ऐश्वर्या भालेराव कार्यरत आहेत.
एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने सदर महिला अधिकाऱ्यास २४ तास सेवा द्यावी लागत आहे. येथील पोलिस स्टेशन अंतर्गत ५२ खेडी समाविष्ट आहेत. त्यामुळे आरोपीचे मेडिकल करण्यासाठी सदर महिला अधिकाऱ्यास २४ तास कर्तव्यावर राहावे लागत आहे. कर्मचाऱ्यांची संख्याही कमी असल्याने आरोग्यसेवा पुरवण्यात मर्यादा येत आहेत. प्रशासनाने यार बाबीचा सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. रिक्त असलेल्या जागावर त्वरित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी व नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा पुरविण्यात यावी, अशी येथील सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने मागणी होत आहे.
प्रभारी अध्यक्षाच्या गावची व्यथा
शिरपूर आरोग्यवर्धिनी केंद्र जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष डाॅ.शाम गाभणे यांच्या मतदार संघाच्या गावात आहे. शिरपूर गावासह परिसरातील गावे या आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत येतात. जिल्हा परिषद अध्यक्षांनी यामध्ये लक्ष देऊन ही समस्या सोडविण्याची गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.