शेतमाल विकून घरी निघालेल्या शेतकऱ्याला एक लाख रुपयांनी लुटले

One lakh rupees was looted from a farmer who went home after selling farm produce
One lakh rupees was looted from a farmer who went home after selling farm produce
Updated on

विवरा (जि.अकोला) : पातूर तालुक्यातील ग्राम मळसूर येथील विलास यशवंत काळे हे हरभरा विक्री करून अकोल्याहून परत घरी येत असताना, समोरून येणाऱ्या मोटर सायकल वर दोन जणांनी पेट्रोल संपल्याचे कारण सांगून मदत मागितली आणि विलास काळे यांना एक लाखांनी लूटल्याची घटना शनिवार (ता.२७) च्या रात्री घडली आहे. त्यामुळे परिसारात भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे.


मळसूर येथील विलास काळे यांनी ता.२७ मार्च रोजी पातूर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. विलास काळे हे अकोला येथील बाजारात हरभरा विक्री करून एक लाख रूपयांची रोकड घेऊन पातूर मार्गे मळसूर कडे येत असताना अकोला ते पातूर मार्गावरील भंडारज फाट्याजवळ समोरून येणाऱ्या मोटरसायकलवर दोन स्वारांनी मोटरसायकलमधील पेट्रोल संपले असे सांगून, काळे यांच्याकडे मदत मागितली.

काळे व मदत मागणारे दोघे असे, तिघेजण पातूर जवळील फुलारी पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्यासाठी आले, आणि पेट्रोल घेऊन परत जाताना काळे यांच्याजवळ रक्कम असल्याचे अज्ञात दोघांचे निदर्शनात आले. त्यामुळे त्या अज्ञात दोघांनी काळे यांचे एक लाख रूपये लूटले. याप्रकरणी विलास काळे यांनी शनिवारी (ता.२७) पातूर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

सदर घटनेमुळे पातुर तालुक्यातील विशेषतः बाभूळगाव, जांभरून, विवरा, आलेगाव, चान्नी, चतारी या गावातील सर्वच लोकांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याकरिता बाभूळगाव ते भंडारज रोड चा जास्त उपयोग केला जात असल्याने परिसरातील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.