मोताळा: कार-ऑटोरिक्षाचा अपघात; एक ठार, जखमींना रुग्णालयात केले दाखल

Two persons were killed and one seriously injured in a road accident on Deola-Nashik road
Two persons were killed and one seriously injured in a road accident on Deola-Nashik road
Updated on

मोताळा : कार व मालवाहू ऑटोरिक्षाच्या अपघातात (car and rikshaw accident) एक जण ठार झाल्याची घटना मोताळा-मलकापूर मार्गावरील शेलापूर गावानजीक सोमवारी (ता.२१) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली. सतिष रमेश नंदाने (३८) असे मृतकाचे (one person died) नाव आहे. तालुक्यातील शेलापूर येथील सतिष रमेश नंदाने व अनंता पांडे हे दोघे जण मालवाहू ऑटोरिक्षा (एम.ए च. २० ए.टी. २५८१) या वाहनात आर.ओ. प्लांटवर पाणी आणण्यासाठी जात होते.

Two persons were killed and one seriously injured in a road accident on Deola-Nashik road
गतिमंद मुलीवर अत्याचार; महिलेसह ९ जणांना अटक

तर, आर्टिका कार (एम.पी. ६८ डी.सी. २६७०) या गाडीमध्ये चार जण बुलडाण्याकडून बुऱ्हाणपूरकडे जात होते. दरम्यान, शेलापूर गावानजीक सदर कार व ऑटोरिक्षाचा अपघात झाला. या अपघातात ऑटोरिक्षातील सतिष रमेश नंदाने (३८) यांचा मृत्यू झाला. तर, अनंता पांडे हे गंभीर जखमी झाले. सोबतच कारमधील काही जणांना जबर दुखापत झाली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविले.

अपघाताची माहिती मिळताच बोराखेडीचे पीएसआय अनिल भुसारी, पोहेकाँ राजेश आगाशे, पोकाँ विजय पैठणे, चालक पोहेकाँ शरद खर्चे यांनी घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली. शेलापूर येथे मृतक सतिष नंदाने यांच्या भाचीचा आज (ता.२१) साखरपुड्याचा कार्यक्रम होता. त्यामुळे नातेवाईकांसह पाहुण्यांची वर्दळ होती. जेवणाची पंगत बसलेली असताना पिण्याचे पाणी आणण्यासाठी सतिष नंदाने व अनंता पांडे हे दोघे जण ऑटोरिक्षा घेऊन शेलापूर गावानजीकच्या आर.ओ. प्लांटवर जात होते.

परंतु वाटेतच त्यांचा अपघात होऊन सतिष नंदाने यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही वार्ता समजताच कार्यक्रम स्थळी शोककल्लोळ उडाला. सतिष यांचा अकाली मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती आहे. याप्रकरणी वृत्त लिहिपर्यंत बोराखेडी पोलिसांत कोणत्याच प्रकारचा गुन्हा दाखल झाला नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.